Ashok Chavan : राज्यातील एकात्मता धोक्यात ; ध्रुवीकरणाच्या प्रयत्नातून दंगलीही घडतायेत..

सरकारला अल्टीमेटम देण्याचा प्रश्नच नाही, परंतु या माध्यमातून जो काही ध्रुवीकरणाचा आणि जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो धोकादायक आहे. (Ashok Chavan)
PWD Minister Ashok Chavan
PWD Minister Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. (Nanded) या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण आहे. राज्यातील एकात्मता धोक्यात आली असून ध्रुवीकरणाचा होत असलेला प्रयत्न अधिक धोकादायक असून यातून काही भागात दंगली घडल्या आहेत. (Marathwada) हा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी सामोपचाराने हाताळावा, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नादंडचे पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड येथे प्रसार माध्यमांनी राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरून राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटम बद्दल चव्हाण यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, सरकारला अल्टीमेटम देण्याचा प्रश्नच नाही, परंतु या माध्यमातून जो काही ध्रुवीकरणाचा आणि जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो धोकादायक आहे. काही भागात या मुद्यावरू दंगली देखील झाल्या आहेत.

अशा वातावरणामुळे राज्यातील एकात्मता धोक्यात आली आहे, हे चित्र राज्याच्या हिताचे नाही. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सामोपचाराने हाताळावा. राज्यातील वातावरण शांत कसे राहील याचा देखील प्रयत्न झाला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

शहरातील बांधकाम व्यवसायिक बियाणी यांच्या हत्येच्या तपासा संदर्भात बोलतांना चव्हाण म्हणाले, पोलिसांच्या हातात महत्वाचे धागेदोरे लागत आहेत. परंतु अद्यापही एखाद्या निष्कर्षावर पोलिस आलेले नाहीत, त्यांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.

PWD Minister Ashok Chavan
Rajesh Tope : सत्तार-भुमरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडत आहेत ; आघाडीत असे चालणार नाही..

त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे, उठसूठ पोलिसांवर टीका करणे देखील योग्य नाही. पोलिस स्वतंत्रपणे काम करत आहेत, त्यांच्यावर कुणाचा दबाव असण्याचे कारण नाही. पण तपासात अडथळा निर्माण होईल, असे विधान कुणी करू नये, असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com