Ashok Chavan Thanaks To Nitin Gadkari : अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार..

Marathwada : मुळात या ठिकाणी केंद्रीय मार्गनिधीतून लिफ्ट व स्कायवॉकसह रोप वे उभारण्याचे देखील नियोजन होते.
Ashok chavan-Nitin Gadkari news
Ashok chavan-Nitin Gadkari news Sarkarnama

Nanded : काॅंग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर देवस्थानी लिफ्ट आणि स्कायवाॅक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाच्या भूमीपजूनासाठी १९ मे रोजी नितीन गडकरी हे माहूरला येणार आहेत. माहूर गड हे केवळ महाराष्ट्रच नाही, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात.

Ashok chavan-Nitin Gadkari news
DR.Bhagwat Karad News : `प्रधानमंत्री स्वनिधी` तून आता फेरीवाल्यांनाही १० ते ५० हजारापर्यंत कर्ज ..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह महाराष्ट्रातील बहुतांश राजकीय नेते हे माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे माहूर गडाच्या विकासाकडे सगळ्याच नेत्यांचे लक्ष असते. त्यात (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातच हे धार्मिक क्षेत्र असल्याने त्यांनी माहूरगडाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत रोप वे ची मागणी केली होती.

परंतु रोप वे उभारण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने इथे आता लिफ्ट आणि स्कायवाॅक उभारण्याचा निर्णय नुकताच नितीन गडकरी यांनी घेतल्याचे जाहिर केले. (Nanded) त्यानंतर अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. (Marathwada) चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आई रेणुकामातेच्या माहूर गडावर चार लिफ्ट व स्कायवॉकचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी भूमिपूजन होत असल्याचे वाचून अतिशय आनंद झाला.

त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो. मुळात या ठिकाणी केंद्रीय मार्गनिधीतून लिफ्ट व स्कायवॉकसह रोप वे उभारण्याचे देखील नियोजन होते. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड'सोबत याविषयी करारही झाला होता. श्री क्षेत्र माहूर येथे रोप वे उभारणे काही कारणास्तव शक्य झालेले नसले तरी लिफ्ट व स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com