सचिन पवार
Aurangabad East Assembly constituency : निवडणुकीच्या निकालाच्या आधीच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरुन जलील यांच्यावर गुरुवारी ( ता. 21) रात्री उशीरा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी इम्तियाज जलील आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जालिंदर शेंडगे हे पंडित नेहरू महाविद्यालयातील बूथवर आपसात भिडले होते. यानंतर शेंडगे यांनी गुरुवारी रात्री उशीरा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार जलील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतनगर परिसरात केंद्रावर मतदान सुरु असताना इम्तियाज जलील हे 15 ते 20 जणांसह तेथे आले. त्यांनी मतदारांना धमकावण्यास सुरु केले. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता मला जातीवाचक शिवीगाळ करुन अंगावर धावून आले. लाथाबुक्यांनी मारहाण केली. उपस्थित लोकांनी मला सोडवले.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील विरुद्ध भाजपचे अतुल सावे अशी लढत होत आहे. इम्तियाज जलील यांनी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतुल सावे यांच्याकडून दलित आणि मुस्लिम भागात पैशांचे वाटप करून त्यांना मतदानापासून रोखल्याचा आरोप केला होता. तसेच या विषयीचा व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला होता.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.