Nanded Congress News : सगळं दिलं तरी काहीजण सोडून गेले, पण कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष शाबूत ठेवला..

At Nanded's Congress meeting, office bearers and workers were praised : भाजप भ्रष्टाचारी पक्ष बनला असून त्यांच्या फसव्या शासकीय योजनेमुळे जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनताच महायुती सरकारला खाली खेचणार, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
Ashok Chavan- Nanded Congress
Ashok Chavan- Nanded CongressSarkarnama
Published on
Updated on

Nanded Congress Political News : काँग्रेस पक्षाने सगळं दिलं, तरी काहीजण पक्षाला सोडून गेले. सत्ता, पद, प्रतिष्ठा ज्या काँग्रेसने दिली त्या पक्षाला सोडताना काहीच वाटले नसेल का? पण सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्ह्यात पक्ष शाबूत ठेवला, अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. लातूरमध्ये काल तीन जिल्ह्याचा मेळावा पार पडल्यानंतर आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते नांदेडमध्ये होते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करत काँग्रेसने नांदेडमध्ये पक्षाची ताकद कायम असल्याचे दाखवून दिले. (Ashok Chavan) त्यानंतर झालेल्या पहिल्याच पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी सगळ्यांचे तोंडभरून कौतुक केले. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेतले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्ला चढवताना भाजपने मराठवाड्याच्या विकासाला कीड लावल्याचा आरोप केला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला शंभर जागा पार करता येणार नाही. बारा बलुतेदाराच्या विकासासाठी तसेच शेतक-यांना संजीवनी देण्यासाठी काँग्रेसच पर्याय असल्याचे पटोले यांनी सांगितले.

भाजप भ्रष्टाचारी पक्ष बनला असून त्यांच्या फसव्या शासकीय योजनेमुळे जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. (Nanded) आगामी निवडणुकांमध्ये जनताच महायुती सरकारला खाली खेचणार, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भोकर मतदारसंघातील काही उत्साही पदाधिकाऱ्यांनी समर्थकाच्या उमेदवारीसाठी घोषणाबाजी केली, तेव्हा नाना पटोलेंनी त्यांना खडसावले. अशी स्टटंबाजी चालणार नाही, अशा स्टटंबाजांना अजिबात तिकीट मिळणार नाही, असे स्पष्ट केले. तेव्हा घोषणाबाजी करणारे शांत बसले.

आम्ही घाबरणारे नाहीत..

काँग्रेस पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे नांदेडची जागा काँग्रेसला मिळाली. नेते येतील आणि जातील पण नांदेडमध्ये काँग्रेस कोणी संपवू शकत नाही. काँग्रेसची मूळं नांदेड जिल्ह्यात खोलवर रुजली आहेत. `डर गया सो..भाग गया, पण आम्ही घाबरणारे नाहीत असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. दरम्यान, सकल मराठा आंदोलकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बैठकीत येऊन मराठा आरक्षणाविषयी पक्षाची ठोस भूमिका काय आहे? ते तात्काळ सांगा असे म्हणत जाब विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com