अतुल सावे भ्रष्टाचारी आमदार, त्यांना निलंबित करा; तरुणाचे टाॅवरवर चढत आंदोलन

अतुल सावे हे भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी पोलिसांना हाताशी धरून आपल्याला खूप त्रास दिला. माझा अवतार, वाढलेली दाढी हा त्याचाच परिणाम आहे. (Mla Atul Save)
Mla Atul Save

Mla Atul Save

Sarkarnama

Published on
Updated on

औरंगाबाद ः मुंबईत हिवाळी अधिवेशन सुरू असतांना इकडे औरंगाबादेत एका तरुणाने भाजपचे आमदार अतुल सावे (Atul Save) यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. (Bjp) विधानसभा अध्यक्षांकडे आपण सावे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत, तेव्हा त्यांना निलंबित करा, अशी मागणी करत संभाजी भोसले या तरुणाने टाॅवरवर चढत तीन तास आंदोलन केले. (Aurangabad)

पोलिसांनी समजुत काढल्यानंतर हा तरूण खाली उतरला. हा प्रकार पाहण्यासाठी औरंगाबाद तहसिल कार्यालयात मोठी गर्दी जमली होती. संभाजी भोसले नावाचा एक तरुण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करत आहे.

आपल्या मागणीच दखल घेतली जात नाही, असे लक्षात आल्यानंतर त्याने आज टोकाचे पाऊल उचलले. औरंगाबाद तहसिल कार्यालयात असलेल्या एका टाॅवरवर चढत सकाळी संभाजी भोसले याने आंदोलन सुरू केले. हा प्रकार प्रत्यक्षदर्शनींच्या लक्षात आल्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिस आयुक्त निखील गुप्ता हे स्वतः घटनास्थळावर दाखल झाले. तीन तास या आंदोलनकर्त्यांला खाली उतरण्याची विनंती केली जात होती. अखेल पोलिसा आयुक्तांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत संभाजी भोसले खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

<div class="paragraphs"><p>Mla Atul Save</p></div>
कोंबडी चोर, बेडुक आता मांजर झाले आहेत ; दानवेंचा राणेंवर प्रहार

अतुल सावे हे भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी पोलिसांना हाताशी धरून आपल्याला खूप त्रास दिला. माझा अवतार, वाढलेली दाढी हा त्याचाच परिणाम आहे. मी अतुल सावे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे विधानसभा अध्यक्षांकडे दिले असल्याचा दावा करतांनाच त्यांना निलंबित केले नाही, तर पुढे मी काय करतो हे पहाच, अशी धमकी देखील भोसले नावाच्या या तरुणाने प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com