Atul Save Replay Mla Ajbe : टक्केवारी घेतल्याचे सिद्ध करा, नाहीतर आमदारकीचा राजीनामा द्या..

Beed News : जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. कधीही निधी देतांना दुजाभाव केला नाही.
Atul Save Replay Mla Ajbe News
Atul Save Replay Mla Ajbe NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राष्ट्रवादीचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी माझ्यावर टक्केवारी घेत असल्याचे आरोप हे बिनबुडाचे आणि केवळ राजकीय स्टंटबाजीतून केले आहेत. (Atul Save Replay Mla Ajbe) आता त्यांनी आरोप केले आहेत, तर ते सिद्ध करावेत, किंवा आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आजबे यांना दिले आहे.

Atul Save Replay Mla Ajbe News
Mp OmRaje Nimabalkar Warn Officers : कचरा, अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीने ओमराजे भडकले, अधिकाऱ्यांना झापले ...

जिल्ह्यात निधी वाटप करतांना आपण कधीही दुजाभाव केला नाही, असेही सावे (Atul Save) यांनी स्पष्ट केले. बीड येथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajbe) यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

अतुल सावे हे एजंट नेमून विकास कामाच्या नावाखाली टक्केवारी गोळा करत आहेत. (Beed News) त्यांनी जिल्ह्यातून कामांसाठी १० टक्क्यांनी वसुली केलीय. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी १० टक्के देऊन कामे आणली आहेत. टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम त्यांनी दिले नाही, असा आरोपही आजबे यांनी केला होता.

यावर सावे यांनी आज प्रतिउत्तर देतांनाच आजबे यांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. सावे म्हणाले, आजबे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, राजकीय हेतूने केले आहेत. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. कधीही निधी देतांना दुजाभाव केला नाही.

उलट महाविकास आघाडीचे सरकार असतांना तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना निधी न देता आपल्या पक्षाच्या आमदारांना झुकते माप दिले होते. त्यामुळे आजबे यांनी आरोप करतांना विचार केला पाहिजे. टक्केवारी, वसुलीचा आरोप करतांना त्यांनी आता ते सिद्ध करावे. अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्यावा, असेही सावे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com