Aurangabad : पाय अडकून कोसळणाऱ्या कॅमेरामनला अमित ठाकरेंनी सावरले..

अमित ठाकरे यांच्या समयसुचकतेमूळे कॅमेरामनचा महागडा कॅमेरा तर वाचलाच, शिवाय त्याला होणारी दुखापत देखील टळली. (MNS Aurangabad)
MNS Leader Amit Thackeray
MNS Leader Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. राज ठाकरे आज पुण्यात आहेत, तर त्यांचे चिरंजीव (Amit Thackeray) अमित ठाकरे हे काल रात्रीच औरंगाबादेत दाखल झाले. त्यांच्यासोबत मनसेचे संदीप देशपांडे व इतर नेतेही पुर्वतयारीसाठी आले आहेत. (MNS) आज दुपारी अमित ठाकरे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पाहणीसाठी गेले होते. (Aurangabad) अर्थातच तेव्हा प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांची देखील गर्दी झाली होती.

पाहणीची दृश्य कव्हर करतांना होणाऱ्या धावपळीत एका कॅमेरामनचा पाय अडकला आणि तो कॅमेरासह कोसळणार तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या अमित ठाकरे यांनी त्याचा कॅमेरा आणि त्यालाही सावरले. त्यामुळे बिचाऱ्या कॅमेरामनचा कॅमेरा आणइ तोही दुखापतीपासून बचावला.

राज ठाकरे हे स्पष्ट वक्ते आणि फटकाळ म्हणून ओळखले जातात. पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या या फटकाळ स्वभावाचा अनुभव अनकेदा येत असतो. एवढेच नाही तर जाहीर सभांमध्ये जेव्हा अतिउत्साही कार्यकर्ते घोषणाबाजी करून व्यत्यय आणतात तेव्हा देखील राज ठाकरे त्यांच्या आपल्या खास शैलीत समाचार घेतात. पण राज ठाकरे यांना जवळून पाहणारे अनुभवणारे त्यांचे समर्थक मात्र त्यांच्यात एक प्रेमळ राजकारणी देखील दडलेला असल्याचे सांगतात.

राज ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात उतरलेले त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील कार्यकर्त्यांना जपणारे म्हणून ओळखले जातात. उद्या राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होत असल्याने ते कालच औरंगाबादेत मोटारीने दाखल झाले, मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागतही केले. आज दुपारी अमित ठाकरे यांनी मैदानावर जाऊन सभेच्या नियोजनाची पाहणी केली.

MNS Leader Amit Thackeray
MIM : `राजसभे`ला एमआयएमचा ना विरोध ना समर्थन..

हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधी कॅमेरामनची देखील स्पर्धा लागली होती. या धावपळीतच एका चॅनलच्या कॅमेरामेनचा तोल गेला आणि तो कॅमेरासह खाली कोसळणार तेवढ्यात मागेच उभ्या असलेल्या अमित ठाकरे यांनी एका हाताने कॅमेरा आणि दुसऱ्या हाताने कॅमेरामनला सावरले.

अमित ठाकरे यांच्या समयसुचकतेमूळे कॅमेरामनचा महागडा कॅमेरा तर वाचलाच, शिवाय त्याला होणारी दुखापत देखील टळली. अमित ठाकरे यांच्या या आधारामुळे कॅमेरामन मात्र चांगलाच सुखावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com