Aurangabad : घरकुल योजनेची फाईल केंद्र सरकारने रोखली ; ३९ हजार घरे संकटात..

केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले होते. त्यानुसार ते पाठपुरावा करत असून, आर्थिक वर्षे संपण्यास तीन दिवस शिल्लक आहेत. (Aurangabad District)
PMAY Scheme, Aurangabad
PMAY Scheme, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना लागलेली घरघर कायम आहे. महापालिकेने (Municipal Corporation) अवघ्या तीन आठवड्यात प्रकल्पाचा तयार करून पाठविलेला प्रस्ताव आता केंद्र शासनाने रोखला आहे. (Aurangabad) विलंबाने प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे कारण देण्यात आले असून, अशाच प्रकारे राज्यातील इतर महापालिकांच्या देखील फायली रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (Marathwada)

केंद्र शासनाने २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची २०१६ मध्ये घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेने बेघरांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले. पण जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला जागा मिळाली नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेला जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात महापालिकेने सात ठिकाणी ३९ हजार ७६० घरे बांधण्यासाठी एकूण चार हजार ६२७. २८ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला.

राज्य शासनाने देखील हा प्रस्ताव मंजूर करत केंद्र शासनाकडे पाठविला. केंद्र शासनाने घरकुल योजनेची निविदा प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडे गेला. पण प्रस्ताव विलंब झाल्याचे कारण देत रोखण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील इतर महापालिकांचे प्रस्ताव देखील हेच कारण देत थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

PMAY Scheme, Aurangabad
आखाडा परिषद, संत महंतांकडून अब्दुल सत्तार यांना जननायक पुरस्कार

केंद्र व राज्य शासनामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे, त्यातूनच महाराष्ट्रातील घरकुल योजनेच्या फाईल रोखल्या असाव्यात, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. राज्य पातळीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाठपुरावा करत प्रस्ताव केंद्राकडे पाठविला. केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले होते. त्यानुसार ते पाठपुरावा करत असून, आर्थिक वर्षे संपण्यास तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा महापालिका अधिकाऱ्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com