Dr.Bhagwat Karad News : औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. Bjp त्यानंतर सत्तातंर होऊन सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने यात सुधारणा करत छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा ठराव घेऊन तो केंद्राकडे पाठवला होता. आता या नामांतर प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी दिली आहे.
सिडकोतील जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. (Aurangbad) औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला आहे. (Marathwada) प्रत्येक सरकार याचे खापर एकमेकांवर फोडत आले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नामांतराचा प्रस्ताव विधानसभेत मंजुर करून तो केंद्राकडे पाठवण्यात आला होता.
मात्र त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीत सत्तातंर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रस्तावात दुरूस्ती करून छत्रपती संभाजीनगर अशा नामांतराचा नवा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. यावर केंद्रीय गृहविभागाकडून काम सुरू असून लवकरच औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राची मंजुरी मिळणार असल्याचे डाॅ. भागवत कराड यांनी सांगितले.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नेहमीच शहराच्या नामांतराचा विषय कळीचा मुद्दा ठरत आला आहे. येत्या चार-पाच महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. नामांतराचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी भाजप प्रयत्नशील असून महापालिका निवडणुकीपुर्वी जर केंद्राने या नामांतराला मंजुरी दिली तर त्याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. डाॅ. कराड, अतुल सावे हे शहरातील दोन्ही नेते यासाठी प्रयत्नशील आहेत.
महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नामातंराचा ठराव मंजुर करून केंद्राला पाठवला असला तरी त्यावर अंतिम मोहर केंद्राच्या गृहविभागाकडूनच उठवली जाणार आहे. त्यामुळे अर्थातच श्रेयासाठी शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा लागणार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देवून भाजपला त्याचे श्रेय दिले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.