Income Tax Raid In Aurangabad News
Income Tax Raid In Aurangabad NewsSarkarnama

Aurangabad : राजस्थानातील माध्यान्ह भोजन घोटाळ्याचे औरंगाबाद कनेक्शन ? चार ठिकाणी धाडी..

औरंगाबादेत पहाटेपासूनच चार ठिकाणी तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. राजस्थानातील शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादारांवर हे छापे असल्याचे समजते. ( Income Tax Department)
Published on

औरंगाबाद : राजस्थानमधील माध्यान्ह भोजन घोटाळा प्रकरणी आयकर विभागाने आज देशभरातील काही शहरांमध्ये छापे टाकले. या घोटाळ्याचे (Aurangabad) औरंगाबाद कनेक्शन देखील उघडकीस आल्यामुळे आयकर विभागाच्या (Income Tax Department) तब्बल ५६ अधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील एका व्यापाऱ्याच्या घर, हाॅटेल आणि निवासस्थानी छापा टाकला.

राजस्थानमधील मिड डे मिलसाठी संबंधित व्यापारी अन्नधान्य पुरवठा करायचा, अशी माहिती समोर आली आहे. सतीश व्यास असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो शिवसेनेशी जवळीक साधून असल्याची माहिती आहे. (Marathwada) आयकर विभागाने मुंबई, दिल्ली, जयपूर, बंगळुरूसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये छापेमारी केल्याची देखील माहिती आहे.

औरंगाबादेत पहाटेपासूनच चार ठिकाणी तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. राजस्थानातील शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादारांवर हे छापे असल्याचे समजते. शहरात चार ठिकाणी अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेण्यात येत असून प्रत्येकी १४ अधिकारी, कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत.

Income Tax Raid In Aurangabad News
Bhagwat Karad : '..एकतरी भाजपवाला दाखवा ; कराडांचे इम्तियाज जलीलांना आव्हान

यामध्ये महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात देशभरात ५३ ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या असून यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थान मधील काही मंत्र्यांच्या मालमत्तांवर देखील छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com