Aurangabad : बंडखोरीनंतरही ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सत्तार, सिरसाट, भुमरेंचे वर्चस्व कायम

Aurangabad gram Panchayat | पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
Gram Panchayat Activist
Gram Panchayat ActivistSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील सर्वच ठिकाणची राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबादमधील (Aurangabad gram Panchayat) 16 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. (Aurangabad gram Panchayat news update)

आज सकाळपासूनच ग्रामपंचायतींच्या निकाल येण्यास सुरवात झाली आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा प्रभाव असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Gram Panchayat Activist
Shiv sena : ‘नवमर्द’ शिंदे गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी ; शिवसेनेचं टीकास्त्र

वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 मधील तिन्ही आणि वॉर्ड क्रमांक 2 मधील दोन्ही शिंदे गटाचे (आमदार शिरसाठ पॅनल) उमेदवार विजयी झाले आहे. आत्तापर्यत एकूण 17 जागांपैकी 5 जागांचे निकाल हाती लागले आहे. पाचही जागांवर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. पैठण तालुक्यात शिंदे गटाला मोठे यश मिळाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातदेखील एकनाथ शिंदे गटाची जादू चालली आहे. शिवसेना आमदारांचे ग्रामपंचात निवडणुकीत वर्चस्व कायम राहिले आहेत. सिल्लोड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल आज लागत आहे. उपळी,जंजाळा आणि नानेगाव तीनही ग्रामपंचायती आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत. सत्तारांनी सिल्लोड तालुक्यात एकहाती वर्चस्व कायम राखले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com