Raj Thackery News : 'खळखट्याक' प्रकरणी पुरावा नाही; राज ठाकरेंविरोधातील खटला रद्द

Aurangabad High Court : राज ठाकरे यांच्यावरील या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. राज यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी ही कथित घटना घडली तेव्हा मनसे नेते राज ठाकरे हे अटकेत होते. ते घटनास्थळी नव्हते, असा युक्तीवाद केला.
Raj Thackery
Raj ThackerySarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणताही पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधातील खटला रद्द केला. Raj Thackeray and Aurangabad high Court

राज ठाकरे Raj Thackeray यांनी 2008 मध्ये, बिहार आणि उत्तर प्रदेशातील परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या हिरावल्याचा आरोप केला होता. मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसलेल्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भडकवल्याप्रकरणी त्यांच्यावर खैरवाडी (मुंबई) गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांना रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहातून पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. ठाकरे यांची सुटका झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात कल्याण पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले होते.

दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यावेळी एसटी बसेसवर दगडफेक केल्याच्या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह चार मनसे MNS कार्यकर्त्यांवर 21 आक्टोबर 2008 रोजी परांडा (ता. धाराशीव) येथे गुन्हा दाखल झाला होता. तपासानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर हा खटला रद्द करण्याची विनंती प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळी होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला होता.

Raj Thackery
Pune Lok Sabha Constituency : वंचितनंतर एमआयएमच्या एन्ट्रीने रवींद्र धंगेकर खिंडीत? पुण्यात चौरंगी लढत...

त्या विरोधात स्वरराज उर्फ राज श्रीकांत ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायालयाच्या Aurangabad Court आदेशाला ॲड. अरुण शेजवळ यांच्या मार्फत आव्हान दिले. राज ठाकरे यांच्यावरील या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. राज यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी ही कथित घटना घडली तेव्हा मनसे नेते राज ठाकरे हे अटकेत होते. ते घटनास्थळी नव्हते, असा युक्तीवाद केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे यांचे कथित प्रक्षोभक भाषण फिर्यादीने रेकॉर्डवर ठेवलेले नाही आणि आरोपपत्रात देखील जोडलेले नाही, त्या अनुपस्थितीत त्यांनी प्रक्षोभक भाषण केले असे म्हणता येणार नाही, असेही वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व साक्षी, पुरावे पाहिल्यानंतर खंडपीठाने राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवत हा खटला न्या. नितीन सूर्यवंशी यांनी रद्द केला. राज ठाकरे यांच्यातर्फे ॲड. राजेंद्र शिरोडकर, ॲड. सयाजी नांगरे, ॲड. अरुण शेजवळ यांनी या प्रकरणात काम पाहिले.

Raj Thackery
Prajakt Tanpure News : विखे पिता-पुत्राला सल्ला देताना तनपुरेंनी जगताप, कर्डिलेंना डिवचले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com