Aurangabad : औरंगाबादचे संभाजीनगर करा, सगळेच बोलतात पण करत कोणीच नाही..

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत संभाजीनगरचा मुद्दा चांगलाच गाजला. ( Shivsena)
Devendra Fadanvis-Uddhav Thackeray
Devendra Fadanvis-Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : एक संवेदनशील शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत शिवसेना नावाचा पक्ष १९८८ मध्ये दाखल झाला. (Shivsena) प्रखर हिंदुत्व आणि मुंबईत मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी भांडणारी संघटना म्हणून शिवसेना ओळखली जायची. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी येथील जनतेची नस आणि सामाजिक परिस्थिती ओळखली आणि मुंबईनंतर औरंगाबादकडे (Aurangabad) विशेष लक्ष दिले.

समान नागरी कायदा, शहरातील अवैध कत्तल खाने यासारखे स्फोटक विषय आणि त्या विरोधात निघालेल्या मोर्चावर झालेली दगडफेक या घटनेने शिवसेनेचा शहरातील पाया मजबुत झाला. अरे ला का रे म्हणणारे शिवसैनिक रस्त्यावर दिसू लागले आणि महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. २७ नगरसेवक निवडून आले आणि या यशाने बाळासाहेब ठाकरे देखील आश्चर्यचकित झाले.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी मेळावा झाला आणि बाळासाहेबांनी या शहराला नवे नाव दिले, ते म्हणजे संभाजीनगर. हिंदुत्ववादी जनतेनेही ते स्वीकारले. सरकारी कागदावर अजून संभाजीनगर झाले नसले तरी या मुद्याने गेली ३०-३५ वर्ष शिवसेनेला विजयाचे टाॅनिक मात्र दिले.

दरम्यान, १९९५ आणि २०१४ अशी दोन वेळा राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली, पण औरंगाबादचे संभाजीनगर कागदावर काही झालेच नाही. आता पुन्हा हा विषय नव्याने चर्चेत येण्याचे कारण म्हणजे राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आणि ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगर हे नाव दिले त्या बाळासाहेबांचे सुपूत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. त्यामुळे अभी नही तो कभी नही, अशी भावना वर्षानुवर्ष या मुद्यावर मतांचे दान मागणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना, सामान्य शिवसैनिकांना आणि हिंदुत्ववादी जनतेची झाली आहे.

नाही म्हणायला नाव बदलून काय होणार? अशी भूमिका घेणारे राजकीय पक्ष देखील आहेतच, पण जर वर्षानुवर्षे या विषयावर राजकारण आणि सत्तेचे गणित असेल तर मग एकदाचे होऊन जाऊ द्या की, अशी भूमिका विरोधक का घेत नाही? असा प्रश्न देखील सहाजिकच पडतो. तीन विभिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेली ही सत्ता असल्याने मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असून देखील त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न पुर्ण करता येणार नाही, अशी स्थिती आहे.

पण महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेकडून संभाजीनगरच्या मुद्याला पुन्हा हात घालण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत संभाजीनगरचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमदार सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात यावरून चांगलीच खडाजंगी देखील झाली.

Devendra Fadanvis-Uddhav Thackeray
Beed : वाळु माफियांची मुजोरी वाढली, पोलिसाच्या अंगावर ट्रॅकटर घालण्याचा प्रयत्न

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी फडणवीसांनी तुम्हाला दोन ओळीचा ठराव आणता येत नाही का? म्हणत तर मुनगंटीवार यांनी खड्यात गेला पक्ष, आमदारकी, धोरण, बी फाॅर्म, केंद्राची मदत लागत असेल तर मला घेऊन चला, त्यांनी मान्यात दिली नाही तर राजकारण सोडून देईन, पुन्हा कधी निवडणूक लढवणार नाही, असे आव्हान दिले.

तर त्याला भास्कर जाधव यांनी हो संभाजीनगर आम्ही करणारच, पण राज्यात तुमचा मुख्यमंत्री आणि केंद्रात पंतप्रधान असतांना तुम्हाला संभाजीनगर का आठवले नाही? असा सवाल उपस्थित केला. एकंदरित जुन्याच विषयावर समर्थन आणि विरोध करत सत्ताधारी आणि विरोधकांना वेळ मारून न्यायची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com