Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांच्यावर एमआयएमने सोपवली मोठी जबाबदारी..

Imtiaz Jalil : दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून यासाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत .
Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, AurangabadSarkarnama

Imtiaz Jalil : दिल्ली महापालिकेची (MCD) ४ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. सात डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.अन्य लहान पक्षासह अपक्षही या निवडणुकीत आपलं नशीब आजमवत आहेत. (Imtiaz Jalil latest news)

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून यासाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत . या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी एमआयएमने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या खांद्यावर सोपवली आहे. दिल्लीतील प्रचारासाठी एमआयएमची महाराष्ट्रातील टीम दिल्लीत तळ ठोकून आहे.

इम्तियाज जलील यांनी दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ते दररोज वेगवेगळ्या वार्डात सभा घेत आहेत. त्यांच्या सभाना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली महापालिकेच्या २५० वार्डांसाठी ही निवडणूक होत आहे.

Mp Imtiaz Jalil, Aurangabad
MCD Elections 2022 : दिल्ली महापालिका निवडणुकीत महिलांमध्ये चुरस , तीनही पक्षाकडून महिलांना प्राधान्य

या निवडणुकीत काँग्रेस, आप, भाजप या तीनही पक्षानी ५० टक्क्यांपेक्षाही अधिक जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. आरक्षणानुसार २५० पैकी १२५ वार्ड हे महिलांसाठी आरक्षित आहेत.यात आम आदमी पक्षाने २५० पैकी १४० जागांवर महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

काँग्रेस आणि भाजपच्या महिला उमेदवारांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. भाजपने १३७ जागांवर, तर काँग्रेसने १३४ जागांवर महिला निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्या तीन उमेदवारांचा अर्ज रद्द झाला आहे. त्यामुळे २४७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत एकूण १३४९ उमेदवार रिंगणात आहेत. यात ७०७ महिला, तर ६४० महिलांचा समावेश आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (शनिवारी) ६७ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ६६ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सहा जणांनी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेतलेल्या ६७ पैकी ३४ जण पुरुष उमेदवार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com