Aurangabad : महापालिका आयुक्त पांडेय यांची बदली, चौधरी घेणार पदभार

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासोबतच नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. (Municipal commissioner)
Astikkumar Pandey, Municipal commissioner
Astikkumar Pandey, Municipal commissionerSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची राज्य शासनाने सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली केली आहे. (Aurangabad) त्यांच्या जागेवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी हे पदभार घेणार आहेत. अव्वर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.

महापालिका आयुक्त (Municipal commissioner) म्हणून पांडेय यांनी नऊ डिसेंबर २०१९ ला पदभार घेतला होता. त्यानंतर चार महिन्यातच महापालिकेची मुदत संपल्यामुळे प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पदभार देण्यात आला. (Marathwada) आपल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामे मार्गी लावले. महापालिकेला सुमारे पावणे तिनशे कोटी रुपयांचे देणे होते. ही बिले त्यांनी काढली.

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात सुमारे एक हजार कोटींच्या कामांच्या निविदा अंतिम केल्या. यातील काही कामे मार्गी लागली तर काही कामे पाइपलाईनमध्ये आहेत.

कोरोना काळात त्यांनी नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले. कचरा कोंडीतून मुक्तता करताना तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४० हजार घरे बांधण्याचा प्रकल्पाला त्यांनी मंजूरी मिळवून घेतली.

Astikkumar Pandey, Municipal commissioner
अभिमानाने करायची गोष्ट तोंड काळे होत असतांना केली; रहाटकरांची खोचक टीका

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासोबतच नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अडीच वर्षानंतर त्यांची सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची बदली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com