Aurangabad : भाजपच्या जल आक्रोशला राष्ट्रवादीच्या घागर आंदोलनाने प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने देखील शिवसेनेची बाजू घेत भाजप आमदार सावे यांचा निषेध करत घागर फोडो आंदोलन केले. (Ncp)
Ncp Protest for Water in Aurangabad
Ncp Protest for Water in AurangabadSarkarnama

औरंगाबाद : भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत २३ मे रोजी जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. (Aurangabad) या मोर्चाची जय्यत तयारी भाजपकडून सुरू आहे. विशेष म्हणजे या मोर्चाच्या नियोजनाची महत्वाची जबाबदारी पुर्वचे आमदार अतुल सावे यांच्यावर आहे. (Ncp) भाजपकडून शहरातील पाणी प्रश्नाला शिवसेनाच कशी जबाबदार आहे याची पोस्टरबाजी देखील केली जात आहे. (Bjp) नेमंक यावरून आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने अतुल सावे यांनाच कोडींत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सावे आमदार असलेल्या मतदारसंघात सर्वाधिक पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, असा आरोप करत आज राष्ट्रवादीने घागर फोडो आंदोलन करत सावे यांना जाब विचारला आहे. पुंडलीकनगर भागात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांनी घागर फोडत निषेध नोंदवला. पाणी प्रश्नावर अचानक राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने सगळ्यांच्या भुवया मात्र उंचावल्या गेल्या.

महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात शहराला आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा मुद्दा चांगलाच गाजतोय. भाजपने शिवसेनेची कोंडी करत मोर्चाची घोषणा केली, त्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ५० टक्के पाणी कपातीचा निर्णय तातडीने जाहीर केला. या शिवाय पाणी प्रश्नाला भाजप आणि एमआयएमच कसे जबाबदार आहेत, हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला.

Ncp Protest for Water in Aurangabad
लोणीकरांची जीभ घसरली ; म्हणाले, हे सरकार बेमान औलादीचं, मंत्र्यांना समुद्रात बुडवा !

भाजप-सेनेमध्ये हे कुरघोडीचे राजकारण सुरू असतांना आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने देखील शिवसेनेची बाजू घेत भाजप आमदार सावे यांचा निषेध करत घागर फोडो आंदोलन केले. महापालिकेत एक आकडी संख्या असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर आपले संख्याबळ वाढवण्याची संधी मिळणार आहे.

त्यासाठी भाजप विरोधात एकट्या शिवसेने लढा देण्याऐवजी आघाडी सरकार म्हणून मैदानात उतरण्याचे ठरवल्याचे दिसते. राष्ट्रवादीने सावे यांच्या विरोधात आंदोलन करत सुरूवात केली असली तरी काॅंग्रेसकडून अद्याप फारशा हालचाली होतांना दिसत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com