जालना : ओबीसी आरक्षणावरून जालना येथे भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. माजी मंत्री, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आज ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) मंठा शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी ओबीसी आरक्षणावरून आघाडी सरकारचा (Thackeray government) पिंड दान करून जाहीर निषेध केला.
बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. ओबीसी आरक्षणावरुन त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. आंदोलनादरम्यान बोलताना लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी शेलक्या शब्दात आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले.
"ओबीसीच्या आरक्षणाबाबत आघाडी सरकारने न्यायालयाच्या सूचना न पाळल्यामुळे हे आरक्षण गेले. सरकारनं ओबीसींचा गळा घोटला आहे, बेमानी केली आहे. ओबीसी समाज या सरकारला माफ करणार नाही. मध्यप्रदेश सरकारनं ओबीसींचे आरक्षण वाचवलं पण मध्यप्रदेश सरकारला जे जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही," असा सवाल लोणीकर यांनी यावेळी उपस्थित केला.
"मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाबाबत हे सरकार नापास झाले आहे. या सरकारचं आम्ही पिंड दान करुन श्राद्ध घातलं," असे लोणीकर म्हणाले.
"सरकारने आरक्षणाची बाजू कोर्टात व्यवस्थित न मांडल्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली.आघाडी सरकार मधील सर्व मंत्री बोलघेवडे आहेत. या मंत्र्यांना समुद्रात बुडवलं पाहिजे. हे आघाडी सरकार बेमान औलादीच सरकार आहे," अशा शब्दात लोणीकर यांनी सरकारवर टिका केली. "हिरव्या हराळीत जसा साप दिसत नाही, तसं हे तीन पक्षाचं आघाडी सरकार आहे," अशी टिका लोणीकर यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.