राज ठाकरेंच्या सभेला परवनगी मिळणार; पण औरंगाबाद पोलिसांनी ठेवल्या 'या' अटी...

MNS | Raj Thackeray| Aurangabad Police| महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत.
MNS Chief Raj Thackeray, Aurangabad Latest News Updates, Raj Thackeray's Sabha in Aurangabad News Updates
MNS Chief Raj Thackeray, Aurangabad Latest News Updates, Raj Thackeray's Sabha in Aurangabad News UpdatesSarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेण्याची घोषणा केली. त्यानंतर या सभेसाठी सर्व मनसे (MNS) कार्यकर्ते कामाला लागले आहेत. असं असतानाच औरंगाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर, सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर सभेची तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचं ठिकाण बदला, अशी अट औरंगाबाद पोलिसांनी घेतली आहे. (Aurangabad Latest News Updates)

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना १ मे रोजी नियोजित ठिकाणी सभा घ्यायची असेल तर त्यांनी त्यांना तारीख बदलण्याची सूचना औरंगाबाद पोलिसांनी केली आहे. राज ठाकरे यांनी १ मे ला सभेची तारीख जाहिर केली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी रमझान ईद आहे. या सभेत राज ठाकरे यांनी काही आवाहन केल्यास आणि तणाव निर्माण झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं पोलिसांनी सुचवलं आहे.

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad Latest News Updates, Raj Thackeray's Sabha in Aurangabad News Updates
'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करू नका ; गिरीश महाजनांनी मिटकरींना सुनावलं

महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेला मोठी गर्दी होण्याची अपेक्षाही मनसेने व्यक्त केली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरेंची ही सभा औरंगाबादमधील गरवारे स्टेडियमवर घेण्यात यावी, असेही पोलिसांचे म्हणणे आहेत. त्यासाठी स्टेडियमची चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती आहे. पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याच मैदानामध्ये सभा घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com