Aurangabad : तीन हजार कोटींचे प्रकल्प `अमृत`मध्ये, महापालिकेच्या हिश्याचे काय ?

Municipal Corporation : अमृत-२ मध्ये महापालिकेला ३० टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. ही रक्कम ८०० कोटींपेक्षा जास्त आहे.
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation NewsSarkarnama
Published on
Updated on

Municipal Corporation News : शहरासाठी महत्त्वाची पाणी पुरवठा योजना, सातारा-देवळाई ड्रेनेज व कमल तलावाचे सौंदर्यीकरण करणे असे सुमारे ३ हजार १७ कोटींचे प्रकल्प केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समाविष्ट करण्यावर गुरुवारी (ता. आठ) मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. Aurangabad

Aurangabad Municipal Corporation News
Marathwada : सात महिन्यानंतर अखेर भाजपने दाशरथेंवर सोपवली जबाबदारी..

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीसमोर या प्रकल्पांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिकेच्या (Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. त्यानंतर उच्चस्तरीय समितीने या योजना केंद्राच्या अमृत-२ मध्ये समावेश करण्यास मान्यता दिली, असे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. (Aurangabad)

शहरासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. पण एवढा मोठा निधी देण्यासाठी राज्य सरकारची दमछाक होणार होती. त्यामुळे ही योजना केंद्राच्या अमृत-२ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. त्यासोबतच सातारा-देवळाई ड्रेनेज प्रकल्प, कमल तलावाचे सौदर्यीकरण प्रकल्प देखील अमृत-२ मध्ये समावेश करण्यासाठी गुरुवारी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीसमोर सादरीकरण करण्यात आले.

त्यानुसार २७४० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना, सातारा-देवळाई भागासाठीचा २७५ कोटींचा ड्रेनेज प्रकल्प व कमल तलावाच्या सौदर्यीकरणाचा २.७८ कोटी रुपयाचा प्रस्ताव अमृत-२ योजनेत पाठविण्यास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली. पाणी पुरवठा योजनेच्या २७४० कोटीमध्ये १९३ कोटी रुपयांच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्याच्या प्रस्तावाचा देखील समावेश असल्याचे डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, अमृत-२ मध्ये महापालिकेला ३० टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. ही रक्कम ८०० कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र एवढी मोठी रक्कम भरण्याची महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने ही रक्कम राज्य शासनाने भरावी, अशी मागणी महापालिकेतर्फे वारंवार केली जात आहे. पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com