औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाषणाने चांगलेच प्रभावित झाले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रखडलेल्या मराठवाडा विकासाबद्दल मत व्यक्त केल्यानंतर दानवे यांनी त्याला आपल्या खास शैलित प्रत्युत्तर दिले. ते ऐकून वैष्णव चांगलेच प्रभावित झाले. आपल्या भाषणात त्यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे तोंडभरून कौतुक केले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Railway Minister) यांना उद्देशून तुम्ही मेडीकलचे डाॅक्टर आहात. पण रावसाहेब दानवे हे राजकारणातले डाॅक्टर आहे. नुसते डाॅक्टर नाही तर पीएचडी आहेत म्हणत त्यांनी दानवेंचे कौतुक केले. (Aurangabad) जालना, औरंगाबाद येथील रेल्वेस्थानकांचे नुतनीकरण आणि पीटलाइनच्या कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज करण्यात आला.
या कार्यक्रमाला औरंगाबादेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. वैष्णवी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेल्वे विकासा संदर्भातील व्हिजन किती व्यापक आहे हे सांगितले. येत्या दोन-तीन वर्षात रेल्वेचा कसा काया पालट होणार आहे? याचा उल्लेख देखील त्यांनी केला.
खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींच्या अच्छे दिनची आठवण करून देत रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढला. मराठवाड्यातील रेल्वे विकास कसा रखडला हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देतांना रावसाहेब दानवे यांनी याचा संबंध थेट निजाम राजवटीशी जोडला. निजामाला रेल्वेची गरज नव्हती, त्यामुळेच रेल्वेचा विकास या मराठवाड्यात झाला नाही. इम्तियाज जलील आणि आमची दोस्ती पक्की आहे, ते आहेत एमआयएमचे पण भाजपचेच वाटतात, अशी टोलेबाजी दानवे यांनी केली.
दानवेंचे हे भाषण आपण लक्ष देवून ऐकत होतो. डाॅ. कराडांशी याबाबत मी चर्चा देखील केली. त्यांना म्हणालो, तुम्ही मेडीकलचे डाॅक्टर आहात, पण रावसाहेब दानवे हे राजकारणातील डाॅक्टर आहेत. डाॅक्टर नाही, तर त्यांची या क्षेत्रात पीएचडी झाली आहे, असे म्हणत वैष्णवी यांनी दानवेंच्या भाषणाचे कौतुक केले. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या नफ्या-तोट्याचा उल्लेख करत `वो पुराने जमाने की बात कर रहे है`, ते युपीएच्या काळात घडत होते, असा टोला देखील रेल्वे मंत्र्यांनी आपल्या भाषणातून लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.