Aurangabad Teachers Constituency : आमदार विक्रम काळेंना राष्ट्रवादीतूनच आव्हान; वरिष्ठ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत?

मी २००० मध्येच औरंगाबाद मतदारसंघासाठी इच्छूक होतो. मात्र, त्यावेळी वसंतराव काळे यांच्यासाठी माघार घेतली होती.
Vikram Kale-Pradeep Solunke
Vikram Kale-Pradeep SolunkeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय खडाखडीला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad) शिक्षक मतदारसंघ (Teachers Constituency) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला मानला जातो. त्या ठिकाणाहून विक्रम काळे (Vikram Kale) आणि त्यांचे वडिल वसंतराव काळेही (Vasantrao kale) निवडून आलेले आहेत. पण, राष्ट्रवादीत ट्विस्ट आला असून पक्षाचे पदाधिकारी प्रदीप सोळुंके (Pradeep Solunke) यांनी तिकिटासाठी विक्रम काळे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतात, याकडे मराठवाड्याचे लक्ष लागून आहे. (Aurangabad Teachers Constituency: MLA Vikram Kale will be challenged from NCP itself)

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. तत्पूर्वी त्यांचे वडिल वसंतराव काळे यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वसंतराव काळे यांनी मतदारसंघाची मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे भाजपला आतापर्यंत या मतदारसंघात यश आलेले नाही.

Vikram Kale-Pradeep Solunke
Siddheshwar Factory : एकाचा खासगी कारखाना, तर दुसऱ्याचा काडादींसोबत जुना वाद : चिमणीच्या विरोधामागील खेळी रोहित पवारांनी केली उघड

राष्ट्रवादीकडून औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांची उमेदवारी फिक्स मानली जात असतानाच आता त्यांना पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. विक्रम काळे यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाचे वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सोळुंके यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे सोळुंके स्वतः या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेतो, याकडे सर्वांच्या नजरा आहे.

Vikram Kale-Pradeep Solunke
Barshi Blast : बार्शीत फटाके कारखान्यात स्फोट; तीन महिलांचा होरपळून मृत्यू : आठवडे बाजार, दुपारच्या सुटीमुळे मोठी जीवितहानी टळली

सोळुंके यांच्या मागणीने भक्कम वाटणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने आमदार उमेदवार घाेषित केला आहे. भाजपकडून आव्हान असताना आता काळे यांना पक्षातील स्पर्धकांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. यासंदर्भात प्रदीप सोळुंके म्हणाले की, मी २००० मध्येच औरंगाबाद मतदारसंघासाठी इच्छूक होतो. मात्र, त्यावेळी वसंतराव काळे यांच्यासाठी माघार घेतली होती. या वेळी पक्ष मला तिकिट नाकारेल, असं वाटत नाही. तिकिट न मिळाल्यास निवडणूक लढण्याबाबत चाचपणी करून निर्णय घेण्यात येईल.

Vikram Kale-Pradeep Solunke
Jitendra Awhad : ‘ही तीन वर्षे कायम लक्षात राहतील : आणखी किती ठिकाणी अडकविले जाईल, सांगता येत नाही’

येत्या २ फेब्रुवारीला मतमोजणी

विधान परिषदेच्या पदवीधरच्या दोन, तर शिक्षक मतदार संघातील तीन अशा एकूण ५ जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. चार फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाकडून ५ जानेवारीपासून या मतदानासाठी आचारसंहिता लागू केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com