औरंगाबादकरांनो नियम पाळा, लस घ्या; कोरोनाबाधितांचा आकडा ४८४ वर पोहचला..

आज औरंगाबाद शहरात ४१० नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ७४, त्यामुळे आजचा एकूण बाधितांचा आकडा ४८४ वर पोहचला आहे. ( Corona In Aurangabad)
Corona in Aurangabad
Corona in AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा वेग देशात, राज्यात आणि मराठवाड्यात देखील झपाट्याने वाढतो आहे. (Corona) कोरोनाचे नियम पाळा, लस घ्या असे वारंवार आवाहन करून देखील काही नागरिकांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येत आहे. (Aurangabad) त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढते आहे. (Marathwada) आज जिल्ह्यात ४८४ नवे कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दुसऱ्या लाटेत राज्यात मुंबई, पणे, ठाणे, नाशिक सारख्या मोठ्या शहरानंतर औरंगाबादेत कोरोना संसर्गाचा आकडा सर्वाधिक होता. त्याखालोखाल मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले होते. कोरोना, डेल्टा आणि आता ओमीक्राॅनसह कोरोना जगभरात परतला आहे.

राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी अनेक निर्बध लादले असले तरी संसर्गाचे प्रमाण वाढतेच आहे. गेल्या आठवडात ५०-१०० वर असणारी बाधितांची संख्या आता थेट पाचशेच्या घरात पोहचली आहे. सर्वसमान्य नागरीक व प्रशासनासाठी देखील ही चितेंची बाब आहे. यात दिलासादायक एकच बाब म्हणावी लागेल आणि ती म्हणजे कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृतांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

आज औरंगाबाद शहरात ४१० नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ७४, त्यामुळे आजचा एकूण बाधितांचा आकडा ४८४ वर पोहचला आहे. सध्या १८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील संभाजीनगर १, रामनगर २, मिनी घाटी १, चिकलठाणा ५, एन 3- 3, गजानननगर १, हर्सुल ३, बीड बायपास १३, सातारा परिसर ३, समतानगर १, वानखेडेनगर १, पडेगाव ९, भावसिंगपुरा १, म्हाडा कॉलनी ५, जुना बाजार १, मयूरनगर २, एन-८ ४, पिसादेवी १, ब्रिजवाडी १.

Corona in Aurangabad
बागडेंना विरोध कायम, आता सात जागांसाठी १५ उमेदवारांमध्ये लढत

तर भारतनगर १, होनाजीनगर १, एन-७ 3, मोंढानाका १, खडकेश्वर १, एन-५ 3, नारेगाव १, बायजीपुरा १, एन -६ 5, जयभावनी नगर ४, जीएमसी कॅम्पस १, एन -११ १, सिम्प्लीसिटी १, दर्गा रोड १, गारखेडा ३, पिसादेवी १, कल्पवृक्ष सोसायटी १, सिडको १, समर्थ नगर ३, कॅनरा बँक १, बन्सीलाल नगर १, औरंगपुरा १, राज नगर १, सूतगिरणी चौक १, टिळकनगर १, मुकुंदवाडी व इतर भागात ३१० रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात औरंगाबाद २४, फुलंब्री २, गंगापूर ११, कन्नड ७, खुलताबाद १, सिल्लोड ४, वैजापूर १०, पैठण १४, सोयगाव १ असे एकूण ७४ रुग्ण आढळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com