औरंगाबादकरांची मेट्रो कागदावर धावू लागली, प्रत्यक्षात आठ वर्ष लागणार

शहराची चारही दिशांनी होणारी वाढ पाहता मुंबई-दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळे कंपन्यांचे निर्माण होणारे जाळे यामुळे मेट्रोची भविष्यात गरज भासणार आहे. (Aurangabad City)
Aurangabad Metro News

Aurangabad Metro News

Sarkarnama

औरंगाबादः आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर म्हणून लौकिक असलेल्या औरंगाबादेत (Aurangabad) आता मेट्रो धावण्याची शक्यता आहे. शहराचा वेगाने होणारा विस्तार, औद्योगीकरण पाहता भविष्यात मेट्रोची (Metro) गरज भासणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनातील नेतृत्वाने संमती दर्शविली असून आगामी आठ ते दहा वर्षांत मेट्रो रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरू शकते.

महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) तशी तयारी सुरू केली असून त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. शहराची चारही दिशांनी होणारी वाढ पाहता मुंबई-दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळे कंपन्यांचे निर्माण होणारे जाळे यामुळे मेट्रोची भविष्यात गरज भासणार आहे.

वाढत्या नागरिकरणामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक पाठोपाठ औरंगाबाद शहरातदेखील मेट्रो रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाळूज ते ऑरिक सिटी अशी मेट्रो सुरू करण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी महापालिका एजन्सी नियुक्त करणार आहे.

यासंदर्भात प्रशासक पांडेय म्हणाले, मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करून त्याची अंमलबजावणी झाल्यास आठ ते दहा वर्षांत शहरात मेट्रो धावू शकते. केंद्र व राज्य सरकारमधील नेतृत्वाच्या संमतीने हा डीपीआर तयार केला जाणार आहे. मेट्रो रेल्वे शहराची गरज बनली असून, केंद्रीय रेल्वे तसेच अर्थराज्य मंत्र्यांनी देखील लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

<div class="paragraphs"><p>Aurangabad Metro News</p></div>
इतर प्रश्नांना लांबलचक उत्तरे देणारे अजितदादा या सवालावर मात्र हमखास चिडतात..

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी वाळूज व ऑरिक सिटी या दोन एमआयडीसी जोडण्यासाठी डीपीआर तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पीएमसी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात विकासकामे गतीने सुरू आहेत. रस्त्यांची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.

पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहेत. कचरा प्रकल्प मार्गी लागले आहेत. स्मार्ट सिटी अभियानातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे दीर्घकालीन विचार करून मेट्रोचा प्रकल्प राबविला जाईल, असे पांडेय यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com