
औसा : मतदारसंघात सर्वसमावेशक विकास साधत असताना औसा विकासाच्या एका पटरीवर आले आहे. येणाऱ्या काळात औशाच्या विकासासाठी काय करायचे आहे. त्याचा आरखडा तयार असून माजीमंत्री बसवराज पाटील यांनी पाहिलेले लातूर-औसा-गुलबर्गा रेल्वेचे स्वप्न आम्ही दोघे मिळून पुर्ण करणार, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.
विकास व सामाजिक समतोल यामुळे समाजातील सर्वच घटकासह मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा विरोधकांची अस्वस्थता वाढविणारा आहे, असा दावाही पवार यांनी केला. शुक्रवारी औसा येथे आयोजीत प्रचारसभेत ते बोलत होते. मतदारसंघात दर्जेदार विकासकामे पूर्ण करीत असताना मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी मी व विकास पोहचला. औसा शहरात विकासाचे अनेक कामे करीत असताना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तिसऱ्या टप्पा, औसा नूतन बसस्थानक, औसा शहर पाणीपुरवठा योजना, मुंबई च्या धर्तीवर शौचालये, शहरातील अंतर्गत रस्ते,अद्यावत शासकीय विश्राम गृह अशी कामे पूर्ण होत आहेत.
येणाऱ्या काळात औसा शहर हे स्वच्छ, सुरक्षित व सुंदर शहर करायचे आहे. त्या अनुषंगाने शहराचा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्यात आला असून ४ कोटींचा निधी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्या माध्यमातून संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. शहरात कोणत्याही महापुरुषांचे पुतळे नाहीत. त्यामुळे एक स्टॅच्यू पार्क उभारले जाणार असून त्या पार्क मध्ये सर्व महापुरुषांचे प्रेरणादायी पुतळे उभारले जाणार आहेत. शहरातील तीन तलावाच्या संवर्धनासाठी १२ कोटींचा निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात या तलावाच्या संवर्धनाचे कामे पूर्ण केली जातील.
औसा शहरात व्यापारी संकुल उभारणीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर असून या व्यापारी संकुलात विस्तापिंताना प्राधान्य देऊन दुकानांचे वाटप केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला आहे कि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव फरकाची रक्कम येणाऱ्या महिनाभरात दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत असून येणाऱ्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० वरून २१०० रूपयांची वाढीव रक्कम प्रत्येक महिन्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मी व बसवराज पाटील यांच्या माध्यमातून औशाच्या विकासाला डबल इंजिन मिळाल्याचा उल्लेख करून औशाच्या विकासासाठी पुन्हा काम करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मंचावर माजीमंत्री बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, अॅड श्रीकांत सुर्यवंशी, विनोद आर्य, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, शहराध्यक्ष बंडू कोद्रे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रदीप मोरे,भाजपचे शहराध्यक्ष सुनील उटगे, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, संगमेश्वर ठेसे, हाणमंत राचट्टे, अरविंद कुलकर्णी, गोपाळ धानुरे, निसार कुरेशी, अक्रम खान, नदीम शेख, तुराब देशमुख, कल्पना डांगे, जयश्री घोडके, सोनाली गुळबिले, सुवर्णा नाईक, समीर डेंग आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.