लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस

मी काम केली, कसलीही अपेक्षा केली नाही, मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेला माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. (Bjp Leader Pankaja Munde)
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

केज (जि. बीड) : विकास काम करताना गांव व पक्ष असा कधीच भेदभाव केला नाही. आताचे पालकमंत्री भेदभाव करतात. (Beed) आम्ही शुन्याने गुणणारी कामं करणारी नाहीत, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाव न घेता धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना लगावला. लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आलेत, तुमची कामे करण्यासाठी सत्तेची गरज नाही, (Marathwada) तुमचा आशीर्वाद हा मला मंत्रीपदापेक्षा खूप मोठा आहे, असेही त्या म्हणाल्या.

केज पंचायत समितीच्या आठ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २५) झाले. आमदार नमिता मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, उप सभापती ऋषीकेश आडसकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे. आपल्या जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली आहे. म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले आहेत. शेतकरी म्हणतात विमा मिळाला नाही, तेव्हा मला वाईट वाटते. मी पालकमंत्री असते तर अधिकाऱ्यांचे कान धरले असते. शेतकऱ्यांचे काम आधी केले असते.

जिल्ह्यातील राजकारणी कंत्राटदार झाले आहेत. मी बारामतीच्या पंचायत समितीला निधी दिला होता, मात्र भेदभाव कधीही केला नाही. रेल्वेला निधी दिला म्हणून बढाया मारता. पण हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष तरतूद करून मंजूर केला आहे. तुमचं सरकार राज्यात होतं त्यावेळेस जिल्ह्याला निधी का दिला नाही. आयत्या पिठावर रेघोटया ओढण्याची सवय यांना लागली आहे अशी टिकाही त्यांनी केली.

नगरपंचायत निवडणुकीत आमचा विजय नाही मात्र विरोधकांचा पराभव मोठा आहे असेही त्या म्हणाल्या. सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको, नवीन आहात म्हणून कुणावर टीका टिप्पणी केली नाही. मी काम केली, कसलीही अपेक्षा केली नाही, मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेला माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार आहे.

Pankaja Munde
शिवसेनेचा बारामती अॅग्रोला इशारा ; कन्नडचा ऊस घेतल्याशिवाय एकही गाडी येऊ देणार नाही..

आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेलं सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. आम्ही पुढच्या निवडणुका देखील जिंकू, जनता आमच्या पाठिशी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com