Balasaheb Thorat On BJP : बाळासाहेब थोरात म्हणतात, धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणे अन् मतांची चोरी हाच भाजपाचा पॅटर्न!

Congress leader Balasaheb Thorat alleged that BJP’s political pattern : शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, पिकांचे नुकसान झाले, तरी सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
Congress Leader Balasaheb Thorat on BJP News
Congress Leader Balasaheb Thorat on BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

संदीप लांडगे

Congress News : 'धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणे, निवडणूक आयोगाचा गैरवापर करणे आणि मतांची चोरी करणे, हाच भाजपचा पॅटर्न आहे. पण जनता आता त्यांच्या या डावांना बळी पडणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जनता भाजपला धडा शिकवेल' अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, पिकांचे नुकसान झाले, तरी सत्ताधाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोपही थोरात यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागातील कार्यकर्ता, पदाधिकारी मेळावा आणि आढावा बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपाने राज्यात आणि देशात नवा पॅटर्न आणला आहे. धर्माच्या नावाखाली जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम, सत्तेसाठी मतांची चोरी करणे हाच तो पॅटर्न आहे. या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही. सर्वसामान्य, शेतकरी, मजूर, विद्यार्थी अशा सगळ्याच घटकांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, पिकांचे नुकसान झाले, तरी सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. भाजपचे (BJP) उद्दिष्ट फक्त धर्माच्या आड लोकांचे लक्ष महागाई व बेरोजगार पासून विचलित करणे एवढेच आहे. मतांची चोरी झाली आहे, अनेक ठिकाणी खोट्या नावांची नोंदणी झाली हे आता हळूहळू उघड होत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकींत हा मुद्दा नक्कीच गाजणार आहे. काँग्रेस यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे.

Congress Leader Balasaheb Thorat on BJP News
Radhakrishna Vikhe News : मंत्री विखेंनी थोरातांना सुनावले, विरोधकांना आमची चिंता कशाला?

काँग्रेससाठी अडचणीचा काळ असला तरी आमचे विचार मजबूत आहेत आणि याच विचारांच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विविध अनुदान योजना भाजप सरकारने बंद करून टाकल्या. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना अनुदान दिले जात नाही. उलट सरकार नवीन समस्या निर्माण करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.

Congress Leader Balasaheb Thorat on BJP News
BJP leaders Varaha Jayanti trend : भाजप नेत्यांकडून वराह जयंतीचा ट्रेंड, सलग दुसऱ्या वर्षी राणेंच्या आवाहनाला प्रतिसाद : मुस्लीम समाजाला डिवचण्यासाठीचा नवा मुद्दा?

खासदाराकडे किती दारूची दुकाने..

दारू परवान्यांच्या वाटपावरही थोरात यांनी सरकारवर टीका केली. भाजप सरकार एकामागून एक दारूचे परवाने देत आहे. यामुळे जनता दारूच्या आहारी जात आहे आणि सरकार हळूच त्यांच्या खिशात हात घालत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खासदार सत्ताधारी नेत्यांकडे किती दारूचे दुकाने आहेत, याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचे थोरात म्हणाले.

Congress Leader Balasaheb Thorat on BJP News
Congress Politics : काँग्रेसमध्ये धुसफूस, जिल्हाध्यक्ष बदलामुळे नाराजी

वारकरी संप्रदायातील आम्ही देखील आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहमध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे. गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. पण कधीही धर्माचा देखावा केला नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे, त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे, अशी टीका थोरात यांनी किर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com