मराठवाड्यातील नदी काठावर बांबू लावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन करणार..

बांबू पासून फर्निचर बनवण्याचे काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार. (Pasha Patel,Bjp)
Pasha Patel-Pm Modi
Pasha Patel-Pm ModiSarkarnama

औरंगाबाद ः शहरातील खाम नदीच्या दुतर्फा ३ हजार बांबूची लागवड करण्यात येणार आहे. हे काम सीएसआर फंडातून होणार असल्याचे भाजप (Bjp) नेते व कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. (Aurangabad) औरंगाबाद शहराचे वैभव असलेली खाम नदी ही वाहती करण्यासाठी कापूस व्यापरी महेश शरदा यांनी पुढाकार घेतला आहे.

यासाठी महेश शरदा हे आपल्या कंपनीच्या सीएसआर फंडातून आठ किलो मीटर खाम नदीच्या दुतर्फा बांबूची लागवड करणार आहेत. (Marathwada) यासंदर्भात सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांनी पाहणी करून काम करण्याची परवानगी दिली असल्याचे पटेल यांनी सांगितले. (Pm Modi)

बांबू लागवडीमुळे शहराच्या वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे शोषण करून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. तसेच लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात बांबू पासुन तयार होणाऱ्या फर्निचरच्या कारखान्याचे भूमिपूजन पंकजा मुंडे याच्या हस्ते होणार असल्याची माहितीही पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बांबू पासून फर्निचर बनवण्याचे काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्यात वाहणाऱ्या गोदावरी व माजरा नदीच्या अकरा नद्या व ९ उपनद्या आहेत. या नद्यांची जवळपास अडीज हजार किलो मीटर लांबी आहे. नदीच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करण्यात येणार आहे.

Pasha Patel-Pm Modi
Chhagan Bhujbal:ओबीसींची संख्या ३२ टक्के... त्यामुळे २७ टक्के आरक्षण नक्की मिळेल

यासाठी फिनिक्स फाउंडेशन मार्फत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील २५ गावे दत्तक घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर बांबू लावणार आहे, यात शेतकऱ्यांना एकरी २ लाख रुपयांची फाईल मंजूर करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात मराठवाड्यातील नद्यांच्या दुतर्फा बांबू लागवड करण्याचे ध्येय असून लावलेल्या बांबूचे जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com