BAMU News : बलात्कार प्रकरणातील विद्यापीठाचा फरार प्राध्यापक बंडगरला अल्टीमेटम..

Marathwada : याआधीही त्याने काही मुलींना आपल्या घरी पेईंग गेस्ट म्हणून ठेवल्याची चर्चा आहे.
Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News
Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News) नाट्यशास्त्र विभागाचा प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. विशाखा समितीच्या नोटिशींना प्रतिसाद न देणाऱ्या प्रा. बंडगरला आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. कोर्सनिमित्ताने संपर्कात आलेल्या तरुणीला बेकायदा नाट्यशास्त्र विभागात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर तिला `पेईंग गेस्ट` म्हणून घरीच ठेवले.

Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News
Sanjay Shirsat On Sanjay Raut News : राऊतांसारख्या सल्लागारांमुळेच उद्धव ठाकरेंवर ही परिस्थीती ओढावली..

पंधरा दिवसापुर्वी त्या मुलीने समोर येत बंडगर याच्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Aurangabad) याप्रकरणी आरोपी बंडगरची पत्नी पल्लवी देखील सहआरोपी आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघेही मुलींसह फरार आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने प्रा. बंडगरवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. (Marathwada) त्यानंतर, विशाखा समितीसमोर म्हणणे मांडण्याची संधी दिली. मात्र, तो फरार झाल्याने विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली.

चौकशी होईपर्यंत मुख्यालय न सोडण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तरीदेखील प्रा. बंडगर हा चौकशी समितीसमोर हजर झाला नाही. (Fir Filed) समितीने वेळोवेळी नोटीस दिल्या, त्याच्या बेगमपुरा येथील घराच्या दारावर नोटीस चिकटवली. तसेच मुळगावी पोस्टाने नोटीस पाठवली. त्याशिवाय, वारंवार ई मेल देखील केला. बंडगरकडून मात्र, नोकरी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विद्यापीठ प्रशासनाला एकदा वकिलामार्फत, दुसऱ्यांदा दुतामार्फत आणि तिसऱ्यांदा कुरिअरने पत्र पाठविण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, विद्यापीठानेही त्याची एकदाही नोटीस स्वीकारली नाही. त्याने स्वत:हून भेट देऊन पत्र दिले पाहिजे, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटका मिळवण्यासाठी प्रा. बंडगर विद्यापीठात हजर राहत नाही. मात्र, यामुळे बंडगरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. बंडगर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दबक्या आवाजात मागची प्रकरणे चर्चेला येत आहेत.

याआधीही त्याने काही मुलींना आपल्या घरी पेईंग गेस्ट म्हणून ठेवल्याची चर्चा आहे. त्याही प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. फिर्यादी मुलीच्या प्रवेशाची चौकशी सध्यातरी करण्यात आलेली नाही. ती पिडीत असून यावर नंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरुंनी दिली. विशाखा समितीने कालच बंडगर याला शेवटची नोटीस दिली आहे. सात दिवसांची मुदत आहे. त्यानंतरही प्रा. बंडगर हजर न झाल्यास, समिती अहवाल देईल. दोषी आढळल्यास त्याच्यावर बडतर्फीची कारवाई होईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com