Omraje Nimbalkar: बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशाचा ओमराजेंना धसका; निंबाळकरांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे...

Basavraj Patil Vs Omraje Nimbalkar: बसवराज पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला औसा विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.
Basavaraj Patil Vs Omraje Nimbalkar
Basavaraj Patil Vs Omraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Latur News: औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर प्रभाव असणारे, माजी मंत्री बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसवर कितपत प्रभाव पडणार याची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील ठाकरे गटातील खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी बसवराज (Basavraj Patil Vs Omraje Nimbalkar) यांच्या भाजप प्रवेशाने धसका घेतल्याचे चित्र आहे.

ओमराजे निंबाळकर यांना बळ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात ठाकरेंचा दौरा होता, तो रद्द करण्यात आला होता.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Lok Sabha Constituency 2024) येणाऱ्या औसा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (गुरुवारी) उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा औसा येथे होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लातूर, बुधोडा, लामजना, किल्लारी, कासार शिरशी या मार्गावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. औसा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यामुळे महाविकास आघाडीला औसा विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जाते.

मराठवाड्यातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते म्हणून बसवराज पाटील यांची ओळख आहे. लिंगायत समाजातील एक प्रबळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाटील यांचा होमपिच असलेला उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा (Bhagwant Khuba) यांच्या मार्फत बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची रणनीती ठरली होती.

Basavaraj Patil Vs Omraje Nimbalkar
Solapur News: लोकसभेच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटणार? 40 गावे कर्नाटकात जाण्याच्या तयारीत; 'आमचे रक्त घ्या, पण पाणी द्या'

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ बसवराज पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्यासारख्याच बसवराज यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सुरू होत्या. अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून घेतला.

निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे निंबाळकर हे सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता.ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी नवखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करून दाखवली. त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषदेत सत्तापालट केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com