Shaktipeeth highway survey opposition : ''लाडकी'चे दीड हजार वापस घ्या, पण...'; 'शक्तिपीठ'साठी एक इंच जमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Farmers local women opposed land survey Shaktipeeth highway Beed Ambajogai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाला बीडच्या अंबाजोगाईमध्ये शेतकरी आणि महिलांनी तीव्र विरोध केला आहे.
Shaktipith highway Beed Ambajogai
Shaktipith highway Beed AmbajogaiSarkarnama
Published on
Updated on

Beed Ambajogai highway protest : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे. मात्र या शक्तिपीठाला दररोज विरोध वाढू लागला आहे.

बीड अंबाजोगाई इथं शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आणि महिलांनी जमिनीची मोजदाद न करता वापस पाठवले. यावेळी महिलांनी तीव्र भावना व्यक्त करताना, जमिनी घेऊ नका, वाटल्यास लाडकी म्हणून देत असलेले, दीड हजार रुपये देऊ नका, असा टोला महायुती सरकारला लगावला.

शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठी 760 किलोमीटरचा महामार्ग असणार आहे. बीड (BEED) जिल्ह्यातून अंबाजोगाई आणि परळी इथून हा महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी अधिकारी आले होते. त्यावेळी शेतकरी आणि महिलांनी तीव्र विरोध केला.

Shaktipith highway Beed Ambajogai
Ramdas Athawale On Raj Thackeray : 'राज ठाकरेंच्या घरी जाऊच नका'; मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला देताच, मंत्री आठवलेंचं 'मनसे'च्या मान्यतेवर मोठं विधान

अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा, धायगुडा, भारज, गित्ता, वरवटी गावातील शेतकऱ्यांनी (Farmer) एकत्र येत, अधिकाऱ्यांकडून जमिनीची सुरू असलेल्या मोजणीला विरोध केला. शेतकरी आणि महिलांनी एकत्र येत, 'शक्तिपीठ'साठी एक इंच देखील जमीन देणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. जमिनीची मोजदाद देखील करून दिली नाही. अधिकाऱ्यांना शेतकरी आणि महिलांनी तेथून काढून दिले.

Shaktipith highway Beed Ambajogai
Fadnavis Government Trust : फडणवीस सरकारवर महाराष्ट्राचा आहे विश्वास; कारणं काय आहेत?

शेतकऱ्यांबरोबर महिलांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी महायुती सरकारला विनंती करताना, सरकारनं लाडक्या बहिणीच्या जमिनी घेऊ नये, वाटल्यास लाडकी म्हणून देत असलेले दीड हजार रुपये वापर घ्यावेत. पण आमच्या जमिनी घेऊन नये. जमिनी घेतल्या आम्ही काय खायचं? असा सवाल केला.

अंबाजोगाई इथं शेतकरी आणि महिलांनी घेतलेल्या भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेऊ,, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. वेळ पडली, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला. नागपूर ते गोवा जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणींहून विरोध होत आहे. कोल्हापूरमध्ये पहिल्यापासून या महामार्गाविरोधात शेतकरी आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत विरोध सुरू ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com