Beed : टॅंकर घोटाळा प्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

वाहनांचा कालावधी वाढविणे, लॉगबुकवर सरपंच ग्रामसेवकांच्या स्वाक्षऱ्या नसणे, वाहनांचे फिटनेस, लॉगबुक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रावर खाडाखोड आदी अनेक अनियमितता आढळल्या होत्या. (Minister Gulabrao Patil)
Water Supply Minister Gulabrao Patil Meeting In Mumbai News
Water Supply Minister Gulabrao Patil Meeting In Mumbai NewsSarkarnama
Published on
Updated on

बीड : घोटाळा आणि बीड जिल्हा असे समिकरणच झाले आहे. मागच्या काळात देवस्थान जमिन घोटाळ्यानंतर आता जलजीवन मिशनच्या कामांच्या मंजूरीत घोटाळ्यांची चौकशी सुरु असताना दुष्काळातील टँकरने पाणी पुरवठ्यातील घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. (Beed) या प्रकरणातील दोषी एजन्सीवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. आमदार संदीप क्षीरसागर, प्रधान सचिव संजीव जैस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आदींसह संबंधीत अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. (Sandip Kshirsagar) आमदार संदीप क्षीरसागर यांनी २०१९ मध्ये जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार करत कारवाईसाठी पाठपुरावा केला होता.

याबाबत विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या समितीने चौकशी करुन अहवाल सादर केला होता. अहवालात घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यावरुन मंगळवारी पाटील यांनी बैठकीत वरील आदेश दिले. जिल्हा परिषदे अंतर्गत 2019-20 इतर वर्षांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा कामाची निविदा लातूरच्या वतन ट्रान्सपोर्टला देण्यात आली होती.

याबाबत क्षीरसागर यांच्या तक्रार व विधीमंडळातील लक्षवेधीनंतर विभागीय आयुक्तांच्या समितीने चौकशी केली. यात वाहनांचा कालावधी वाढविणे, लॉगबुकवर सरपंच ग्रामसेवकांच्या स्वाक्षऱ्या नसणे, वाहनांचे फिटनेस, लॉगबुक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रावर खाडाखोड आदी अनेक अनियमितता आढळल्या होत्या.

Water Supply Minister Gulabrao Patil Meeting In Mumbai News
सत्तारांच्या `टाइट`नंतर हालचालींना वेग, मतदारसंघात उभारणार कृषी औद्योगिक पार्क..

सदर अहवालही बैठकीत मांडण्यात आला. यावरुन संबंधीतांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले.दरम्यान, या मुख्य एजन्सीने काही खासगी कंत्राटदारही नियुक्त केले होते. यात जिल्ह्यातीलही काही टँकरमाफियांचा समावेश आहे. त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com