Beed fake currency case : ‘गावचा नेता की नोटांचा खेळाडू?’ पेट्रोल पंपावर संशय अन् पकडला बनावट नोटांचा डाव; बीड कनेक्शन उघड!

Beed Former Sarpanch, Trader Arrested in Fake Currency Case by Tamil Nadu Police : बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणणे आणि त्यांची वाहतूकप्रकरणी बीडमधील सरपंच आणि व्यापाऱ्याला अटक केली आहे.
Beed fake currency case
Beed fake currency caseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra crime news : बीडमधील केज तालुक्यातील डोका गावाचा माजी सरपंच आणि त्याचा व्यापारी मित्र, या दोघांनी बनावट नोटा मिळवून, त्या चलनात आणणे, त्यांची वाहतूक करणे आदी प्रकाराने खळबळ उडाली आहे. तामिळनाडू पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

तामिळनाडू पोलिसांच्या या कारवाईमुळे बीडमधून बनावट नोटा चलनात आणल्या जाण्याचं रॅकेट कार्यरत असून, या नोटा तामिळनाडून इथून प्रवास करत येत असल्याचे कनेक्शन उघड झाल्याने, चर्चांना तोंड फुटलं आहे.

बीडच्या (BEED) केज तालुक्यातील डोका गावचा माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे(वय 54) आणि व्यापारी नारायण राम (वय 34) या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा तामिळनाडू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिस तपासादरम्यान आरोपींनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर परिसरात यापूर्वीही अनेक बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती दिली आहे.

त्यामुळे हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून, मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन, तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) प्रकरण तपासणीसाठी सोपवण्यात आले आहे.

Beed fake currency case
Ahilyanagar Mayor Election : अजितदादांच्या निधनानंतरचा पहिला सत्तासंग्राम! अहिल्यानगर महापौरपदावर राज्याचं लक्ष, दादा नसताना संग्रामभैय्यांची पहिली कसोटी

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची सतर्कता

तामिळनाडू पोलिसांनी केज तालुक्यातील डोका गावातील माजी सरपंचासह एका व्यापाऱ्याला 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटांसह थुवकुडी (जि. तिरुचिरापल्ली)पोलिसांनी 21 जानेवारीला अटक केली. हे दोघे त्यांच्या खासगी कारने तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरले. तिथं त्यांनी इंधन भरल्याच्या बदल्यात 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. हे दोघे तिथून पुढे सरकल्यावर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटला. त्याने सतर्कता दाखवत, तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

Beed fake currency case
Top 10 News : अजितदादांची शेवटची सही, 'पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

तामिळनाडू CID तपास

पोलिसांनी पुढे मंजाथिदल चेकपोस्टवर सापळा रचत या दोघांची कार अडवली. कारची झडतीत तामिळनाडू पोलिसांना 200 रुपयांच्या नोटांचे तब्बल 41 बंडल लपवून ठेवलेले आढळले. तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या बनावट नोटा कोठून घेतल्या? मुख्य सूत्रधार कोण? रॅकेट कोठून-कोठपर्यंत आहे? हा व्यवहार कधीपासून सुरू आहे? अशा अनेक अँगलने तामिळनाडू CID तपास सुरू केला आहे.

बीड कनेक्शनने खळबळ

या बनावट नोटांमध्ये बीडमधील कनेक्शन समोर आल्याने महाराष्ट्र राज्यात देखील खळबळ उडाली आहे. मध्यंतरी बीडमधील गुन्हेगारीने राज्य हादरून सोडलं होतं. आता बनावट नोटांमध्ये इतर राज्यात कनेक्शन समोर आल्याने, हा प्रकार नेमका कधीपासून सुरू आहे, याची चर्चा आहे. या माजी सरपंच कोणत्या राजकीय पक्षाची निगडीत होता? त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त होता? अशा प्रश्नांवर चर्चा सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com