Bajrang Sonwane : पंकजा मुंडेंना धक्का दिल्यानंतर सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; 'सत्ताधाऱ्यांनी करायचे ते केले, पण...'

Beed Lok Sabha Election result 2024 : बीड जिल्ह्यातील तमाम मतदारांनी मला आशीर्वाद दिला आहे. त्या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातील जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे.
Bajrang Sonwane
Bajrang SonwaneSarkarnama

Beed Lok Sabha Election 2024 Result : बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. मतदानादिवशी बोगस मतदान झाल्याचे आरोपही झाले. सोनवणेंनी जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले. त्यामुळे बीडमध्ये नेमके काय होणार याचीच चर्चा राज्यात होती. या घासून झालेल्या लढतील बजरंग सोनवणेंनी बाजी मारली. त्यानंतर बीडच्या जनतेचे आभार मानत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातील तमाम मतदारांनी मला आशीर्वाद दिला आहे. त्या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातील जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. यानंतर त्यांनी चार फेऱ्या बाकी असतानाच विजय पक्का झाला होता, असा दावाही केला.

पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो की 4 जूनला बजरंग सोनवणेच खासदार असणार आहे. बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्यासारख्या गरीबाच्या पोरा धनदांडग्यांच्या विरोधात निवडून दिले याचा अभिमान आहे. याचे श्रेय सर्वस्वी बीडच्या जनतेला जाते, असेही त्यांनी ठासून सांगितले.

बीडमध्ये सोनवणेंना सर्व पातळीवर संघर्ष करावा लागण्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले, हा विजय सोपा होता की नाही, हे सर्वांना माहीत आहे. बीडमध्ये काय-काय झाले हे सर्वश्रृत आहे. आज माझी 55 हजार मते बाहेर गेलेली आहेत. अन्यथा माझा विजय आतापेक्षा जास्त मतांनी झाला असता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सोनवणे निवडणूक काळात आणि मतदानादिवशी आलेल्या प्रशासनाच्या अनुभवाबाबतही बोलले. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी ज्या काही यंत्रणा वापरायच्या होत्या त्या माझ्याविरोधात वापरल्या. मात्र जनता माझ्या बाजूने होती. तो वरून पाहतोय, असे म्हणत सोनवणेंनी पुन्हा बीडकरांचे आभार व्यक्त केले.

Bajrang Sonwane
Bajrang Sonwane Win : पवारसाहेबांच्या 'बजरंगा'ची कमाल ! पंकजा मुंडेंचा निसटता पराभव; सोनवणे विजयी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com