Bajrang Sonwane Win : पवारसाहेबांच्या 'बजरंगा'ची कमाल ! पंकजा मुंडेंचा निसटता पराभव; सोनवणे विजयी

Bajrang Sonwane Vs Pankaja Munde : रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत सोनवणेंचा विजय जाहीर होताच शरद पवार गटात एकच जल्लोष झाला.
Bajrang Sonwane, Pankaja Munde
Bajrang Sonwane, Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा 6 हजार 585 मतांनी पराभव केला. रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत सोनवणेंनी बाजी मारताच शरद पवार गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सोनवणेंचा हा विजय मोठा मानला जात आहे.

बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडेंचे तिकीट फिक्स केल्यानंतर बजरंग सोनवणेंनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पावर गटात प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देत मुंडेंसमोर मोठे आव्हान उभे केले. त्यास पात्र ठरत बजरंग सोनवणेंनी बीडमधून निसटता का निसटता का होईला विजय खेचून आणला.

पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी ताकद लावली. मंत्री धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा यांना निवडून आणण्यासाठी सर्व काही चाली खेळल्या. तर सोनवणेंसाठी शरद पवारांनी आपल्या अनुभव पणाला लावत योग्य नियोजन केले. उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या नेत्यांनीही रसद पुरवली. मात्र मतदानादिवशी अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप बजरंग सोनवणेंनी केला होता. यामुळे आधीच चर्चेत असलेल्या हा मतदारसंघ हिटलिस्टरच आला.

दरम्यान, मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा थेट फटका बीड, जालना, नांदेड, परभणी या मतदारसंघाना बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत बीडमध्ये ओबीसी आणि मराठा मतांचे ध्रुवीकरण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोनवणेंच्या विजयात महाविकास आघाडीच्या ताकदीसह जरांगे फॅक्टरही लागू होतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मतमोजणीत कधी बजरंग सोनवणे तर कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. त्यांच्यातील मताधिक्य हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असायचे. त्यामुळे बीडकरांची धाकधूक कायम कमीजास्त होत होती. दरम्यान, मतमोजणीत सोनवणेंचा कमी मतांनी विजय झाल्याचे पाहून मुंडेंनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. त्यात सोनवणेंचा 6 हजार 585 मतांनी सोनवणे विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

Bajrang Sonwane, Pankaja Munde
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांची भाजपात एन्ट्री अन् चिखलीकरांची लोकसभेतून एक्झिट; काय हा योगायोग..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com