Beed Lok Sabha Election News : डॉ. ज्योती मेटेंसाठी आग्रही असलेल्या अशोक हिंगेंनाच वंचितची उमेदवारी

Political News : रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अशोक हिंगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. अशोक हिंगे सुरुवातीपासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत पुढे असतात.
Ashok Hinge, Joytee Mete
Ashok Hinge, Joytee Mete Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून जोरात सुरु आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून डॉ. ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पडली. रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अशोक हिंगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. अशोक हिंगे सुरुवातीपासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत पुढे असतात.

बीड लोकसभा मतदारसंघातून सर्वप्रथम भाजपने राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Ncp) पक्षाकडून उमेदवारीसाठी बजरंग सोनवणे यांच्यासह डॉ. ज्योती मेटे (Joytee Mete) यांचे नाव चर्चेत होते. (Beed Lok Sabha Election News)

Ashok Hinge, Joytee Mete
Jalgaon Politics : सुनेविरोधात प्रचाराला नकार देणारे खडसे मुलीच्या विरोधात प्रचार करतील का?

त्यावेळी जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने डॉ. मेटे यांना उमेदवारी दिली तर वंचितचा त्यांना पाठींबा देण्याबाबत आपण वंचितचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे अशोक हिंगे म्हणत होते. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी बजरंग सोनवणे यांना जाहीर झाल्यानंतरही आपण निवडणुक लढविणारच, अशी घोषणा डॉ. ज्योती मेटे यांनी केली. त्यावर डॉ. मेटे यांनी वंचितकडून लोकसभेची उमेदवारी घ्यावी, असे आवाहनन खुद्द अशोक हिंगे यांनी केले होते.

लोकसभा निवडणुकीत डॉ. ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर दिवंगत विनायकराव मेटे यांच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या अकाली मृत्यूचा सहानुभूती पुर्वक विचार करून व त्यांना श्रद्धांजली वंचितकडून पाठिंबा देण्याचा निर्णय ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या परवानगीने घेतला होता. कोल्हापूर येथील निवडणुकीत शाहु महाराजांचे वंशज छत्रपती श्रीमंत शाहू महाराज व बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा वंचितच्या वतीने देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीने डॉ. मेटे यांना उमेदवारी न दिल्याने आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती, अशोक हिंगे यांनी शनिवारी पत्रकात दिली होती. पण, दुसऱ्याच दिवशी पक्षाने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे.

दरम्यान, अशोक हिंगे सुरुवातीपासून सामाजिक आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्यात सक्रीय असतात. पुढेही काँग्रेसमध्ये काम करताना ते सामाजिक चळवळीसह मराठा आरक्षण चळवळीत आघाडीवर असतात. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले. नगर-बीड-परळी रेल्वे आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलनाचे त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत.

गेल्या वर्षीपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातही ते सक्रीय असतात. अशोक हिंगे यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी वंचितमध्ये प्रवेश करुन बीड विधानसभेची निवडणूक लढविली होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर वंचितच्या विभागीय अध्यक्षपदाची धुरा सोपविली. आता त्यांच्या गळ्यात वंचितच्या उमेदवारीची माळ पडली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Ashok Hinge, Joytee Mete
Jyoti Mete News : उमेदवारी नाही तरी पण ज्योती मेटेंचे शक्तिप्रदर्शन; काय आहे प्लॅन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com