Beed News: "मला बीडमध्ये येऊ दिलं नाही तर..." मुंडे बहीण-भावाला जरांगे पाटलांचा इशारा; म्हणाले...

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी 8 जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा रद्द करण्यात आली आहे.
Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Dhananjay Munde
Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी 8 जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. तर या सभेच्या अनुषंगानेच आपण 4 जून ही उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलल्याने आता 4 जूनच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे.

बीडच्या केज तालुक्यातील नांदुरघाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची भेट जरांगे पाटील यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतलीय. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, बीडमध्ये (Beed) हा जो काही प्रकार सुरू आहे, तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते. मराठ्यांच्या मताची यांना गरज आहे, परंतु मराठा (Maratha) समाज बांधवांची नाही, त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात फीरायचं आहे

मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारू, असे म्हटले जात आहे. तसेच मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असे देखील म्हटले जात आहे. परंतु मुंडे बहीण-भावाने एक लक्षात घ्यावे, मला बीडमध्ये येऊ दिलं नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. असा इशाराच त्यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Dhananjay Munde and Pankaja Munde) यांना दिला. तसेच मुंडे बहिण भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत असा आरोपही पाटील यांनी केला. शिवाय माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Dhananjay Munde
Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगरात जय बाबाजी कोणाचं भलं करणार ?

बीडमधील सभा रद्द

मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी बीडमध्ये तब्बल 900 एकरात होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. बीडमध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे . अशातच सभेसाठी जमलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही सभा रद्द करण्यात आली आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com