Beed News : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांच्या बाजार समितीतील सत्तेला हादरा देण्यासाठी विरोधकांकडून दोन स्वतंत्र पॅनल उभे केल्यास त्याचा फायदा क्षीरसागरांनाच होईल. यावर महाविकास आघाडी आणि महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये एकमत झाले. त्यामुळे क्षीरसागरांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी व महायुती मिळून एकत्रित पॅनल देण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे दोनच पॅनलमध्ये थेट लढत होवून क्षीरसागरांची बाजार समितीतील सत्ता उलथवून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जरी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी आणि महायुतीची तोंड विरुद्ध दिशेला असली, तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती निवडणुकीत एकच पॅनल असावे, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे यांनी मांडली. (Beed) त्याला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यांना सोबत घेवू असे म्हणत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे.
१८ संचालकांच्या बीड बाजार समितीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे कायम वर्चवस्व राहिलेली ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे क्षीरसागर यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, सुरेश धस यांच्या मदतीने पॅनल उभे केले आहे. बॅनरवर त्यांचे फोटो झळकल्यामुळे हे दोघेही क्षीरसागर यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते.
तर या पॅनलच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी, काॅंग्रेस व शेतकरी आंदोलन समितीने आपले पॅनल तयार केले आहे. तर शिंदेची शिवसेना- भाजप आणि शिवसंग्राम संघटना तिसरे पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहे. परंतु तिसरे पॅनल म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मदत करण्यासाठी उभे केले जात असल्याचा आरोप केला जातोय.
तीन पॅनलमध्ये लढत झाली तर याचा थेट फायदा क्षीरसागरांनाच होणार हे लक्षात आल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीचे मिळून एकच पॅनल असावे यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गट, भाजप आणि शिवसंग्रामच्या नेत्यांची बैठक झाली. या संदर्भात पत्रकार परिषद घेत त्यांनी एकत्रित लढण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.