Khultabad Market Committee: पत नसलेल्या खुल्ताबाद बाजार समितीचे लासूरमध्ये विलीनीकरण..

Marathwada News: प्राधिकरणाला न्यायलयाकडून निवडणूक थांबविण्याची परवानगी घ्यावी लागेल.
Market Committee Election News
Market Committee Election NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील काही आर्थिक पत नसणाऱ्या बाजार समित्यांचे बाजार (Market Committee) समितीत विलीनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील नांदेड, जळगाव यांच्यासह छत्रपती संभजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबादच्या बाजार समितीचे लासूर बाजार समितीमध्ये विलनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील पत्र सरकारतर्फे पाठवण्यात आले आहे.

Market Committee Election News
Sharad Pawar News : शरद पवारांनी विरोधकांच्या अजून एका मुद्दाची हवा काढली ; मोदींची डिग्री हा...

मात्र या बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु असल्यामुळे हे विलीनीकरण होणार की नाही याबाबत साशंकता आहे. (Marathwada) शासन स्तरावरील समितीने हा निर्णय दिला असून त्याचे पत्रही जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झाले आहे. (Farmers) न्यायालयच्या आदेशाने लासुर बाजार समितीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात बाजार समितीची निवडणूकी प्रक्रिया सुरु आहे. २८ व ३० एप्रिला रोजी यासाठी मतदान होणार आहे.

असे असताना अचानकपणे राज्य सरकारने तीन बाजार समिती विलीनीकरणचे आदेश काढले आहेत. यामुळे निवडणूक सुरु असलेल्या ठिकाणचे उमेदवार आणि इतर लोक संभ्रमात आहेत. दुसरीकडे खुल्ताबाद बाजार समितीचे विलीनीकरण करु नये, अशी मागणीही सातत्याने होत आहे.

खुल्ताबाद बाजार समिती विलनीकरणाचा आदेश असला तरी जर विलीनीकरण करायचे असेल तर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला न्यायलयाकडून निवडणूक थांबविण्याची परवानगी घ्यावी लागेल. न्यायलयाने आदेश दिल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. परवानगी मिळाली तर लासुर स्टेशनसह नांदेड व जळगाव बाजार समितीची निवडणूक रद्द करावी लागेल. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर निवडणूक घ्यावी लागेल.

परवानगी नाकरल्यास विलीनीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता राहील. दरम्यान, खुल्ताबाद बाजार समिती ही लासुर स्टेशन बाजार समितीमध्ये विलीन करण्याचे आदेश आल्याचे सांगत उपनिबंधक बारहाते म्हणाले, याबाबात राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण निर्णय घेईल. या संदर्भात आज किंवा मंगळवारी प्राधिकरणाशी चर्चा करण्यात येणार आहे.(Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com