

Beed News : बीड नगर परिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक सूरज जयसिंग चुंगडे यांना जात पडताळणी समितीने मोठा झटका दिला. आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध घोषित करून ते जप्त करण्याचे कडक आदेश दिले.
पेठ बीड वॉर्ड क्र. ५ मधून विमुक्त जाती-अ या राखीव जा गेवरून चुंगडे निवडून आले होते. त्यांनी राजपूत भामटा - १० या जातीचा दावा केला होता. मात्र, विमुक्त जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचा ग्राह्य पुरावा ते सादर करू शकले नाहीत.
दक्षता पथकाच्या चौकशीत त्यांच्या वडिलांच्या व नातेवाइकांच्या जुन्या शालेय नोंदींमध्ये 'हिंदू राजपूत' अशी नोंद आढळली. तसेच रक्ताचे नाते सिद्ध करणारी वंशावळ नसल्याने समितीने त्यांचा दावा अमान्य केला. पडताळणी समितीने ११ डिसेंबर २००७ रोजी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र रद्द करत जप्तीचे आदेश दिले.
उपलब्ध पुराव्यांआधारे महिनाभरापूर्वीच जात प्रमाणपत्र अवैध घोषित केले आहे. तसेच संबंधित जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेशही समितीने दिले आहेत.
- उमेश सोनवणे, उपआयुक्त, जात पडताळणी विभाग, बीड
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.