Beed Ncp News : उमेदवार ठरण्याआधीच बीडमध्ये `भावी खासदार` म्हणून पंडितांचे बॅनर ..

Ncp : धनंजय मुंडे यांचा नकार पाहता अमरसिंह पंडीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Beed Ncp News
Beed Ncp News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. (Beed Ncp News) राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडीत, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत आहेत. मुंडे यांनी आपण लोकसभा लढवण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. आपल्यासाठी दिल्ली अजून दूर आहे, असे म्हणत त्यांनी असमर्थता दर्शवली आहे.

Beed Ncp News
Duel between Danve-Gorantyal : आमची डबल इंजिनची गाडी बसायचे त्याने बसा, पण ड्रायव्हर मीच..

त्यामुळे अमरसिंह पंडीत (Amarsingh Pandit) यांच्यात गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटू लागला आहे. त्यामुळेच (Beed News) बीड शहरात अमरसिंह पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त `भावी खासदार` असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणूक वर्षभरावर आल्यानंतर उमेदवार ठरवण्यासाठी राज्य पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. (Ncp) महाविकास आघाडीचे मराठवाड्यात कोणत्या पक्षाने कुठून लढायचे, किती जागा लढायच्या हे देखील पक्के झाल्याचे बोलले जाते. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. विधानसभा, नुकत्याच झालेल्या बाजार समिती, सोसायटी निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी केली आहे.

भाजपच्या विद्यमान खासदार डाॅ.प्रीतम मुंडे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याने पक्षात मुंडे, पंडित या दोन नावांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छूक नसल्याचे सांगणारे धनंजय मुंडे बुथनिहाय गणित मात्र लावून बसले आहेत. तर अमरसिंह पंडित यांनी मात्र अद्याप कुठलाच दावा केलेला नाही. दुसरीकडे खासदार प्रीतम मुंडे यांनी विरोधकांना आपल्या विरोधात उमेदवारच मिळत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीला डिवचले आहे.

तगडा उमेदवार असला तर लढायला आनंद वाटेल, असा टोला देखील त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. धनंजय मुंडे यांचा लोकसभा लढवण्यास नकार पाहता अमरसिंह पंडीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांकडून बीडमध्ये `भावी खासदार`, चे फलक झळकवण्यात आले आहेत. आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com