निकाल काहीही लागो, पवार मैदानात उतरले अन् हातची गेलेली बाजी लढाईत बदलली..

भावनिक होऊन किंवा परिस्थिती हातची जात असल्याचे पाहून शस्त्र म्यान करण्यापेक्षा लढत राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी दाखविले. (Sharad Pawar)
Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad PawarSarkarnama

बीड : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोरीने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. जणू महाविकास आघाडीचे सरकार पडणार आणि बंडखोरांच्या मदतीने भाजपचे सरकार येणार असे चित्र निर्माण झाले. (Beed) अगदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक ‘मी देवेंद्र गंगाधर फडणवीस शपथ घेतो की’अशा पोस्ट टाकून २३ जुलै ही शपथविधीची तारीखही सोशल मिडीयावर व्हायरल करु लागले. परंतु, ‘हार मानायची नसते, लढायचे असते’हे पुन्हा एकदा जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दाखवून दिले.

त्यामुळे राज्यातील सत्तानाट्याचा निकाल काहीही लागो परंतु हातची पुर्ण गेलेली बाजी त्यांच्या डावपेचांमुळे लढाईत बदलली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. (Marathwada) त्यापाठोपाठा विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. दोन्ही पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का होता. सरकारमधील आमदार फुटल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाले होते.

मात्र, निकालाच्या दुसऱ्याच सकाळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांसह सुरत गाठल्याचे कळाले. आता सरकार कोसळणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असे वातावरण निर्माण झाले. भाजप व देवेंद्र फडणवीस समर्थकांनी २३ जुनची शपथविधीची तारीखही सोशल मिडीयावर निश्चित करुन टाकली. महाविकास आघाडीत पूर्णत: अस्वस्थता निर्माण झाली. शिंदेंच्या गटात एकेक आमदार वाढत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार आणि सरकार कोसळणार असे स्पष्ट चित्र होते. तसे, वातावरण पाहून सरळ स्वभावी आणि राजकीय छक्के पंजांची माहिती नसलेल्या उद्धव ठाकरेंकडून राजीनामाही आलाच असता. अगदी मंत्रालयात मंत्री आपापल्या कार्यालयांतील वस्तूंचा चार्ज देण्याच्या कामातही गुंतलेले होते. परंतु, या सुरुवातीच्या वातावरणात आणि घडामोडींत महाविकास आघाडीचे शिल्पकार जेष्ठ नेते शरद पवार बाजूला होते. परंतु पवारांची एंट्री झाली आणि एकतर्फी झालेली व जणू हातून चाललेली बाजी लढतीत बदलली.

शरद पवार हे ५५ वर्षांहून अधिक काळाचा संसदीय कामाचा अनुभव पाठीशी असलेले नेते आहेत. त्यांना स्वत:ला देखील अशाच धक्क्यातून जावे लागलेले आणि त्यांनीही अनेकदा असे धक्के दिलेले असल्याने त्यांनी ‘सबुरी’चा सल्ला दिल्याचे राजकीय जाणकारांची माहिती आहे. अगदी अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत ‘पावसाचा’खेळ असो किंवा कोणालाही न वाटणारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडीची मोट असो हे शरद पवारच करु शकतात हे सर्वांनाच ज्ञात आहे.

Ncp Leader Sharad Pawar
बाळासाहेब ठाकरे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार ; संभाजीराजेंचे रोखठोक बोल

दरम्यान, भावनिक होऊन किंवा परिस्थिती हातची जात असल्याचे पाहून शस्त्र म्यान करण्यापेक्षा लढत राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी दाखविले. परिणामी उद्धव ठाकरेंनी वर्षावरचा मुक्काम हलविला पण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याच सल्ल्याने लांबविला. त्यामुळे २३ तारीख टळून आता २७ उजाडली आहे. भलेही आता बंडखोरांच्या मदतीने भाजपची बाजू बळकट झाली असली तरी लांबलेल्या लढाईमुळे त्यांची कसरत वाढली आहे.

त्यामुळेच बंडखोर आमदारांचे निलंबन, त्यांनी भविष्यात कोणत्या पक्षात सामिल व्हायचे याचा पेच, निलंबनाच्या नोटीसीवर कायदेशिर लढाई तर खेळावी लागणारच आहे. पण, सुरत ते गुवाहाटीचे हॉटेल आणि बंडखोरांतील अंतर्गत लढाईचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. शस्त्र खाली ठेवून हार माणण्यापेक्षा लढून हारलेले बेहत्तर या शरद पवारांचा कानमंत्रामुळे आजही वातावरण अनिश्चितेच्या गर्तेत आहे.

भलेही आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यंमत्री होतील किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल परंतु लांबलेल्या संघर्षामुळे आता बंडखोरांच्या उणे बाजू समोर येऊ लागल्या आहेत. त्यांची जुनी वक्तव्ये आणि त्यांच्यातील कायदेशिर उणिवा देखील समोर येत आहेत. त्याची पुर्तता करताना त्यांच्याही नाकी नऊ येत आहेत. इकडे बंडखोरीची कारणे आणि अजित पवार यांच्या निधीवाटपातील भेदभावाच्या आरोपांनाही या काळात राष्ट्रवादीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून उत्तरे दिली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com