दत्ता देशमुख
Sandip Kshirsagar Vs Jaydatta Kshirsagar News : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद नवा नाही. याच राजकीय वादातून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांची पुन्हा भाजपची जवळीक वाढल्याने त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान दिले आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता आहे. त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं असे आव्हान आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना दिले.
बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे. याच राजकीय वादातून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांची पुन्हा भाजपची जवळीक वाढल्याने त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले. अलिकडे त्यांची भाजपशी जवळीक वाढली असली तरी जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित नाही.
शहरातील सामाजिक रचना पाहता नगरपालिकेची निवडणुक आघाडीच्या माध्यमातून लढवून ते नंतर प्रवेश करतील असे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान दिले.
जयदत्त क्षीरसागर कुठे आहेत, त्यांची भूमिका काय, असा सवाल करत राजकारणामध्ये भूमिका स्पष्ट असावी लागते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केला आहे हा त्यांचा इतिहास आहे असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चिन्ह घेऊन निवडणुकीत समोर यावे, असे आव्हानही संदीप क्षीरसागर यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.