Suresh Dhas vs Dhananjay Munde : सुरेश धसांचा मंत्री धनंजय मुंडेंबाबत 'रिव्हर्स गियर'? आता 'आकाचा आका' असे नाव घेणार नाही...

Beed Santosh Deshmukh murder case court BJP MLA Suresh Dhas NCP Minister Dhananjay Munde : बीड संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दाखल दोषरोपपत्रानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले.
Suresh Dhas vs Dhananjay Munde
Suresh Dhas vs Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed crime news : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. या हत्येप्रकरणात आमदार सुरेश धस यांनी सुरवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती.

मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडकडे बोट दाखवताना 'आकाचा आका', असे उल्लेख करत होते. पण हा उल्लेख आता करणार नाही, थोडी वाट पाहणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर सध्या तरी 'रिव्हर्स गियर' टाकल्याचे दिसते.

भाजप (BJP) आमदार सुरेश धस म्हणाले, "सुरवातीला काही लोक संबंध नसल्याचे म्हणत होते. पण तेच पुढे या हत्येत मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. त्यांनीच ही सगळी घटना केली. 'SIT'ने दोषारोपपत्र दाखल केले असले, तरी त्यांनी त्यांचा अधिकार अबाधित ठेवला आहे. म्हणजेच, पुढे 'SIT' पुरवणी दोषारोपपत्र दाखल करू शकते".

Suresh Dhas vs Dhananjay Munde
BJP Suresh Dhas : सत्ता.., पालकमंत्री.., पैसा.., मस्ती अन् दहशत! मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलत आमदार धसांनी वाढवल्या अडचणी

याप्रकरणी बीड पोलिस (Police) दलातील काही अधिकाऱ्याची भूमिकेवर शंका व्यक्त करताना आमदार धस यांनी त्यांची नावं घेतली. महाजन, राजेश पाटील या अधिकाऱ्यांची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे. डॉ. वायभासे याचा रोल काय? हे सांगणं महत्वाचे ठरणार आहे, असे आमदार धस यांनी म्हटले.

Suresh Dhas vs Dhananjay Munde
Beed Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड मास्टरमाईंड मग, खासदार सोनवणे अन् आमदार धसांचा रोख कोणाकडे?

'आकाचा आका'

मंत्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणातील रोल काय? यावर बोलताना आमदार धस यांनी, अजून मंत्री धनंजय मुंडे यांचा रोल समोर आलेला नाही, म्हणून मी 'आकाचा आका'चे नाव घेणार नाही. जर पुरवणी दोषारोपपत्रात त्यांचे नाव आले, तर बघू आत्ताच मी काही घाई करणार नाही, असे सांगितले.

कुठतरी फायदा होतोय

धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदावर बोलताना, मला वाटते 'आकाच्या आकां'नी काही दिवस मंत्रिपदापासून थोडंसं दूर राहिले, तर बरं राहील. तुमचा काहीना काही फायदा त्यांना मिळतोय, म्हणून काही दिवस बिनखात्याचे मंत्री रहावे, असे आमदार धस यांनी म्हटले.

मुंडेंनी निर्णय घ्यायचा

याशिवाय आमदार धस यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री मुंडेंना नैतिकता दाखवावे, असे सुचवले आहे. त्याचा विचार करून त्यांनी नैतिकतेच्या आधारवर राजीनामा दिला पहिजे. पण द्यायचं का नाही, तो धनंजय मुंडेंचा निर्णय आहे, असेही स्पष्ट केले.

राष्ट्रवादीवर टीका

अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या कोर्टात मंत्रि‍पदाच्या निर्णयाचा चेंडू ढकलला आहे. त्यावर सिक्स की, फोर मारायचा की शून्यावर आऊट होईचे, ते त्यांनी ठरवायचं. पण या सर्व प्रकारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जनतेच्या मनात स्थान क्लिन बोल्ड होत चाललेले आहे, असे मत आमदार धस यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com