Santosh Deshmukh Case Update : कराड, घुले, आंधळेच्या कोट्यवधीच्या 'रसद'वर घाव; 'मर्सिडीज', 'बीएमडब्ल्यू'सारखी अलिशान 10 वाहनं जप्त

Beed Santosh Deshmukh murder case Walmik Karad Sudarshan Ghule Krishna Andhale : बीड संतोष देशमुख हत्येतील संशयित आरोपी वाल्मिक कराड याची वाहने, तर सुदर्शन घुले कृष्णा आंधळे याची मालमत्ता जप्तची कारवाई सुरू करण्यात आली.
Walmik Karad Sudarshan Ghule Krishna Andhale
Walmik Karad Sudarshan Ghule Krishna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे 'SIT'ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आलं आहे. या हत्येत क्रूरतेचा कळस झाला. यावरून महाराष्ट्राभर संताप व्यक्त होत आहे. हत्यारांना सोडू नका, अशीच सर्वत्र भावना आहे.

प्रचंड राजकीय दडपण असलेल्या या घटनेत 'SIT', 'CBI' आणि बीड पोलिसांनी खुबीने तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. आता या आरोपींची रसदवर तपासी यंत्रणेनं घाव घालण्यास सुरवात केली आहे. वाल्मिक कराड, फरार कृष्णा अंधाळे, सुदर्शन घुलेकडील अलिशान वाहन जप्त करण्यासह कोट्यवधीची संपत्ती जप्त केली आहे.

बीडमधील (BEED) संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड याच्याकडील अलिशान, महागडी वाहन 'SIT' ने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू, इनोव्हा टोयोटा, फोर्ड इंडेवर, अशोक लेलँड, अशा वाहनांचा समावेश आहे.

Walmik Karad Sudarshan Ghule Krishna Andhale
Namdevshastri Maharaj news : संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता आधी माहित नव्हती; नामदेवशास्त्री म्हणतात, 'अजाणतेपणानं पहिलं विधान'

वाल्मिक कराडला जमवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती देखील गमावावी लागणार आहे. तसेच वाल्मिक कराडची महाराष्ट्रात अन् महाराष्ट्र (Maharashtra) बाहेर देखील संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. यात कोट्यवधी रुपयांचे प्लॉट, रो-हाऊसबरोबर जमीन आणि अलिशान, महागडी वाहन देखील वाल्मिक कराड याच्या नावावर आहे. काही मालमत्ता त्याच्या नातेवाईकांच्या नावावर आहे.

Walmik Karad Sudarshan Ghule Krishna Andhale
Top Ten News : अबू आझमींचे निलंबन, कोकाटेंचा निकालही आला... वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

या हत्येतील आरोपी सुदर्शन घुले (टाकळीगाव, ता. केज) आणि फरार असलेला कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी ता. धारूर) याची देखील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. फरार कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला हत्या झाली. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळे याच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर आणि केजमधील बँकेत तीन खाते देखील आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी अपरहणासाठी काळ्या रंगाची स्काॅर्पिओ वापरण्यात आली होती. पोलिसांनी हे वाहन जप्त केले ते घुले याचे आहे. याच वाहनातून पुढे पोलिसांना हत्येसंदर्भात तब्बल 19 पुरावे मिळाले. सुदर्शन याच्या वडिलांकडे शेती आहे. सुदर्शन घुले याच्या संपत्तीचा शोध आता पोलिस घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com