Jaydatta Kshirsagar : महाविकास आघाडीचे ठरलेले सूत्र बीड जिल्ह्यात नाही

बीड जिल्ह्यात या योजना राबवताना सरकार म्हणून सर्वांना बरोबर घेण्याऐवजी घमेंडीपणाने त्या राबवल्या जातात, असा टोलाही जयदत्त क्षीरसागर यांनी लगावला. (Beed News)
Shivsena Leader Jaydatta Kshirsagar
Shivsena Leader Jaydatta KshirsagarSarkarnama

बीड : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सक्रीय झाले आहेत. (Beed) त्यांनी आता महाविकास आघाडीचे ठरलेले सुत्र आणि जिल्ह्यात या सुत्राची होणारी पायमल्ली याबाबत थेट मत व्यक्त केले. महाविकास आघाडीचे (Marathwada) ठरलेले सुत्र जिल्ह्यात राबविले जाते का, असा सवाल करत संघटनेला बळकटी देण्यासाठी शिवसेनेला (Jaydatta Kshirsagar) ठोस निर्णय घ्यावे लागतील, असे म्हटले आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु आहे. माजलगाव येथे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, बाळासाहेब अंभुरे, जिल्हा प्रमुख अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी विशेषत: बीड मतदार संघात शिवसेना व राष्ट्रवादीच एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे शिवसेनेला प्रत्येक वेळी बायपास केल्याचे चित्र आहे.

याबाबत क्षीरसागर यांनी मत व्यक्त केले. पक्षाने कार्यकर्त्याला बळ द्यायला हवे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसेनेला ठोस निर्णय घ्यावे लागतील. सरकारची कामगिरी, निर्णय आणि जनहिताची कामे जनतेपर्यंत या माध्यमातून पोहोचायला हवी. ओबीसी आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी हे आरक्षण देण्याची पक्षाची भूमिका आहे.

लोकशाहीत मालक कोणी नसतो, निवडून आले म्हणजे सगळे झाले या अविर्भावात कोणी वावरू नये. शासन सत्तेवर येऊन दोन वर्ष झाली आहेत मात्र दुर्दैवाने कोरोना महामारीमुळे नेतृत्वाची कसोटी सुरू झाली आहे. असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून संपूर्ण राज्याला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे.

Shivsena Leader Jaydatta Kshirsagar
`अजित पवार मराठवाड्यावर अन्याय करणार हे माहीत होतं... म्हणूनच आम्ही तयारीला लागलो..`

बीड जिल्ह्यात या योजना राबवताना सरकार म्हणून सर्वांना बरोबर घेण्याऐवजी घमेंडीपणाने त्या राबवल्या जातात, असा टोलाही जयदत्त क्षीरसागर यांनी लगावला. हातात शस्त्र घेऊन लढ म्हणण्यापेक्षा शास्त्राला आधार देऊन लढण्याची ताकद पक्षाने द्यावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जिल्ह्यात नारळ फोडण्याची स्पर्धा सुरू आहे. येणाऱ्या निवडणुका म्हणजे पक्षासाठी आरसा असेल असेही क्षीरसागर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com