Beed News : वाल्मिक कराडच्या नावाने संघटना; स्कॅनरवरून पैसेही गोळा, तांदळेंचा खुलासा तो मी नव्हेच!

Walmik Karad Banner Viral : गुन्हेगारांची संघटना मजबूत करण्यासाठी थेट बॅनरवरती स्कॅनर लावून मदत मागितली जाते, हे पोलिसांना दिसत नाही का?
walmik karad Banner Viral On Social Media
walmik karad Banner Viral On Social MediaSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड यांच्या नावाने स्कॅनरद्वारे निधी गोळा करण्याचा प्रकार समोर आला आहे.

  2. या प्रकरणावर संदीप तांदळे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, “तो मी नव्हे, माझं नाव वापरलं गेलं आहे.”

  3. या घटनेमुळे बीड राजकारणात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Walmik Karad News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मकोका कायद्याअंतर्गत कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याच्या नावाने 'वाल्मीक अण्णा कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य'नावाच्या संघटनेचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, यासोबत स्कॅनर कोडद्वारे मदतही गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार कायदा पायदळी तुडवण्याचा असून यावर कारवाईची मागणी विजयसिंह बांगर यांनी केली. स्कॅनरवरील नाव संदीप तांदळेचे आहे. संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन यावर आहे. मागच्या काही दिवसांपूवी याच संदीप तांदळेने जितेंद्र आव्हाड, सुरेश धस तसेच विजयसिंह बांगर यांना धमक्या दिल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता या नव्या प्रकाराने बीडमध्ये (Beed) खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलिस अधीक्षकांना तक्रार दिली. मात्र, त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे विजयसिंह बांगर यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांची संघटना मजबूत करण्यासाठी थेट बॅनरवरती वाल्मिक कराडचा (Walmik Karad) फोटो आणि स्कॅनर लावून मदत मागितली जाते, हे पोलिसांना दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. या गुंडावर आणि संबंधित प्रकाराबद्दल कारवाई करावी, अथवा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा विजयसिंह बांगर यांनी दिला.

walmik karad Banner Viral On Social Media
Walmik karad: बीडमध्ये चाललंय काय?थोडीशी मदत अण्णासाठी...! वाल्मिक कराडच्या नावानं मागितला जातोय निधी

माझे नाव वापरून निधीची मागणी

भगवान भक्तिगड येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतो. या दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, यंदा अन्नदान कार्यक्रम नसतानाही माझे नाव व माझे क्यूआर कोडचे बॅनर त्यावर वाल्मीक कराड याचे फोटो छापून निधी जमा करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायर करण्यात आले.

यामुळे समाज माध्यमातून माझ्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. या बॅनरबद्दल पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन खोडसरपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मी कुठला बॅनर अथवा निधीची मागणी केली नसून कुठल्या आरोपीसोबत किंवा कुठल्या व्यक्तीसोबत माझा काहीच संबंध नसल्याचे संदीप तांदळे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

5 FAQs

  1. प्रश्न: वाल्मिक कराड यांच्या नावाने काय प्रकार घडला आहे?
    उत्तर: त्यांच्या नावाने स्कॅनरद्वारे निधी गोळा करण्याचा प्रकार समोर आला आहे.

  2. प्रश्न: या प्रकरणात संदीप तांदळेंचं नाव का चर्चेत आलं?
    उत्तर: काही सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांचं नाव जोडल्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं की “तो मी नव्हे.”

  3. प्रश्न: हा प्रकार फसवणुकीचा आहे का?
    उत्तर: प्राथमिक माहितीप्रमाणे, निधी गोळा करणाऱ्याने फेक स्कॅनर वापरल्याचा संशय आहे.

  4. प्रश्न: प्रशासन किंवा पोलिसांकडून काही कारवाई झाली का?
    उत्तर: चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

  5. प्रश्न: या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
    उत्तर: स्थानिक पातळीवर विरोधकांकडून टीका आणि सोशल मीडियावर वादविवाद वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com