Bajrang Sonawane : पवारसाहेबांच्या शेजारी खुर्ची मिळाली, बजरंग बाप्पांच्या मोठ्या प्रमोशनची चर्चा रंगली

Sharad Pawar and Bajrang Sonwane Politics : मुंबईत शरद पवार यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडचे बजरंग सोनवणे यांना पवार साहेबांच्या शेजारील खुर्चीत बसवले. बजरंग सोनवणे यांना पवार साहेबांच्या शेजारची खुर्ची मिळाल्याने त्यांना पक्षात प्रमोशन मिळणार, अशी चर्चा आहे.
 Bajrang Sonwane
Bajrang Sonwanesarkarnama

Beed Politics News : बीडमध्ये लोकसभा मतदारसंघात निवडणूक अटीतटीची झाली. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाले. शरद पवार यांनी काल खासदारांच्या उपस्थितीत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात शरद पवार यांच्याच शेजारी बजरंग सोनवणे यांना खुर्ची मिळाली. त्यामुळे बजरंग सोनवणे यांना मोठं प्रमोशन मिळणार, असे संकेत मिळत आहे.

भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे यांनी दिल्लीकडं झेप घेतली आहे. या झेपला बळ मिळाले आहे ते, शरद पवार यांचे! काल शरद पवार यांनी पक्षातील सर्व खासदारांच्या उपस्थित मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बजरंग सोनवणे यांना थेट शरद पवारसाहेबांच्या शेजारीच्या खुर्चीत होते. शरद पवारसाहेबांच्या उजव्या हातालाच बजरंग सोनवणे बसले होते. खासदार अमोल कोल्हे हे बजरंग सोनवणे यांच्या शेजारी होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पवारसाहेबांच्या डाव्या हाताशेजारील खुर्चीत बसले होते.

पत्रकार परिषद होताच बजरंग सोनवणे यांना जयंत पाटील यांनी शरद पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) शेजारील खुर्चीत बसण्याची सूचना केली. बीडमध्ये आम्हाला बजरंगी बाप्पा पावले, अशी भावना जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. जयंत पाटील यांनी असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे जयंत पाटील यांनी महत्त्व सांगितले. यातच बजरंग सोनवणे यांना शरद पवारसाहेबांच्या शेजारीच खुर्ची मिळाल्याने त्यांचे पक्षात प्रमोशन मिळणार, असे संकेत मिळू लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Bajrang Sonwane
Pankaja Munde : कोण म्हणतं पंकजाताई खचल्या? त्या तर पुन्हा स्वारीवर निघाल्या..!

बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने घेतलेली सकारात्मक भूमिका मतदारांपर्यंत गेली नाही, हे पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्याकडे जाणे पसंत केले. बीडमध्ये शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना तो वर्ग आपल्याकडे वळवण्यात यश मिळाले. त्यामुळे ते खासदार होऊ शकले, असे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांनी बजरंग सोनवणे खासदार होण्यामागे केले आहे.

 Bajrang Sonwane
Parbhani Lok Sabha Constituency: अहो आश्चर्यम! जरांगे पाटील यांच्या गावतूनच महादेव जानकरांना लीड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com