Pankaja Munde : कोण म्हणतं पंकजाताई खचल्या? त्या तर पुन्हा स्वारीवर निघाल्या..!

Beed Lok Sabha Election 2024 Result : शेवटपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत सोनवणेंनी बाजी मारत मुंडेंचा पराभव केला. सोनवणेंनी 6 लाख 83 हजार 950 मते घेतली तर पंकजा यांना 6 लाख 77 हजार 397 मते मिळाली. यात त्यांचा 6 हजार 553 असा निसटता पराभव झाला.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama

Beed Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील बीडची लोकसभा निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरली. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बजरंग सोनवणे यांच्या लढतीमुळे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत ही निवडणूक साऱ्यांच्या नजरा खेचून घेणारी राहिली. अखेर सत्ताधीश भाजपच्या पंकजाताईंना सोनवणेंनी हरविले आणि बीडचे खासदार झाले.

या पराभवाने पंकजाताईंचे राजकारण संपले असे बोलले गेले. पण पराभवानंतर अवघ्या 40 तासांनंतर त्या पुन्हा अॅक्शन मोडवर आल्या. थोडक्यात काय तर पंकजाताई पराभवाने खचल्या नाही तर त्या नव्या उमेदीने आभार यात्रेसाठी मतदारसंघ पालथा घालणार आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले यांनी मैदान गाजवले. बंधू धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस एक केला. बीडची आपली सीट येण्यासाठी भाजप नेतृत्वानेही सर्व ताकद पणाला लावली.

शेवटपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत सोनवणेंनी बाजी मारत मुंडेंचा पराभव केला. सोनवणेंनी 6 लाख 83 हजार 950 मते घेतली तर पंकजा यांना 6 लाख 77 हजार 397 मते मिळाली. यात त्यांचा 6 हजार 553 असा निसटता पराभव झाला.

आता पंकजा यांनी हा पराभव स्वीकारत पुन्हा जनतेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुढील आठवड्यापासून आभार दौरा करणार असल्याचे एका व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत विजयासाठी अनेकांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम केले. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले. त्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. पुढील आठवड्यात म्हणजे १२ किंवा १५ तारखेपासून आपण बीड जिल्ह्यात आभार दौरा करणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मतदारांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pankaja Munde
Vishwajeet Kadam : विश्वजीत कदमांनी काय केलं? काँग्रेसला 99 वरून थेट 'सेंच्युरी'वर नेलं..

संघर्ष कायम...

पक्षाच्या बैठका असल्याने मी मुंबई, दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर बीडच्या जनतेची भेट घेणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. देशात सर्वात कमी मतांनी निवडून आलेली किंवा पडलेली बीडची जागा असेल. अत्यंत विपरित परिस्थितीत इतकी टफ फाईट मी देऊ शकले ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावरच! संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप अभिमान वाटतो असेही पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde
Lok Sabha Result Analysis : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा 'स्ट्राइक रेट' दमदार; तर महायुतीचे काय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com