Devendra Fadnavis News : श्रीक्षेत्र भगवानगडाला वनविभागाची चार हेक्टर जागा देणार! दसऱ्याच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Bhagwangad Demand Granted By Central Government : भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती.
CM Devendra Fadnavis Announce Land To Bhagwangad News
CM Devendra Fadnavis Announce Land To Bhagwangad NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भगवानगडासाठी वनविभागाची चार हेक्टर जागा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

  2. मंहत नामेदव शास्त्री यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.

  3. या निर्णयाला केंद्र सरकारकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने भगवानगड विकासाला गती मिळणार आहे.

Marathwada Political News : मराठवाड्यासह राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीश्रेत्र भगवान गडाची एक मोठी मागणी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दिली आहे. श्रीक्षेत्र भगवान गड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागीच चार हेक्टर जागा संस्थानला देण्यास केंद्र सरकार आणि वनविभागाने मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी भक्तगणांच्या सेवासुविधा, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक कार्यासाठी वन विभागाच्या जागेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यासाठी त्यांनी केंद्र सरकार आणि वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आल्याचे फडणवीस यांनी आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेव शास्त्री (Namdev Shashtri) महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती. त्याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज त्याला यश आले.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने त्याची अधिसूचना आज प्रसिद्ध केली. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानतो. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होतो आहे, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

CM Devendra Fadnavis Announce Land To Bhagwangad News
Namdev Shastri On Dhananjay Munde: नामदेव शास्त्रींनी पुन्हा घेतली धनंजय मुंडेंची बाजू; म्हणाले,'पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडून...'

ऊसतोड मजुरांचे श्रद्धास्थान..

महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले भगवान गड हे निसर्गरम्य देवस्थान आहे. राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून भगवानगड ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे.

CM Devendra Fadnavis Announce Land To Bhagwangad News
Devendra Fadnavis: अखेर भाजपचे आमदार हक्कासाठी एकवटले, थेट मुख्यमंत्र्यांकडेच केले गाऱ्हाने!

महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते. हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसविले गेले. तर आता वारकरी संप्रदायातील संत श्री डाॅ.नामदेव महाराज शास्त्री गादीवर विराजमान आहेत

FAQs

प्र.१: भगवानगडासाठी किती जमीन देण्यात आली आहे?
उ: वनविभागाची चार हेक्टर जमीन देण्याचा निर्णय झाला आहे.

प्र.२: ही मागणी कोणी केली होती?
उ: मंहत नामेदव शास्त्री यांनी ही मागणी केली होती.

प्र.३: हा निर्णय कोणी मान्य केला?
उ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी मान्य केली आणि केंद्र सरकारनेही मंजुरी दिली.

प्र.४: या निर्णयामुळे काय होणार आहे?
उ: भगवानगडाच्या विकासाला गती मिळेल आणि भक्तांसाठी सुविधा उपलब्ध होतील.

प्र.५: भक्तांची प्रतिक्रिया काय आहे?
उ: भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com