Cm Eknath Shinde News : भामटा शब्द काढणार, महाराणा प्रतापांच्या नावे आर्थिक विकास महामंडळही सुरू करणार..

Marathwada : अडीच वर्षापुर्वीचे सरकार कोमात होते, आता आपले सरकार जोमात आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : राजपूत समाज हा सुशिक्षित, उच्चशिक्षत आहे. राजकारणात देखील या समाजाचे प्रतिनिधित्व आहे. या समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द वगळण्याची मागणी केली जात आहे. आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलनातून मी भामटा राजपूत यातून भामटा हा शब्द वगळण्याची घोषणा करतो. राज्य सरकार लवकरच या संदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे पाठवेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

Eknath Shinde News
Marathwada Bjp News : मिशन छत्रपती संभाजीनगर ; अभिवादनाला भाजपचे पाच मंत्री..

तिथे देखील कुठलीही अडचण येणार नाही, राजनाथ सिंहजी तिथे आहेतच, असेही शिंदे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. (Bjp) महाराणा प्रताप यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्याची घोषणा देखील याच संमेलनात शिंदे यांनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर महाराणा प्रताप सिंह यांचे कार्य सारखेच होते. (Marathwada) हे दोन्ही राजे महालांमध्ये कधीच रमले नाहीत, ते सर्वसामान्य लोकांमध्ये कायम राहिले, त्यामुळे या दोन्ही राजांचा पराक्रम देखील सारखाच आहे. (Devendra Fadanvis) राजपूत समाज हा लढवय्या आहे, या समाजाच्या अनेक मागण्या आहेत.

आपल सरकार हे सर्व सामान्यांना न्याय देणार सरकार आहे. या समाजाला सरकारी मदतीचे पंख आम्ही लावून त्यांना बळ देणार आहोत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणार आहोत. राजपूत समाजाच्या सोबत असलेला भामटा हा शब्द काढण्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. लवकरच राज्य सरकार केंद्राकडे या संदर्भातला प्रस्ताव पाठवेल. केंद्रात देखील आपले सरकार आहे, राजनाथ सिंह तिथे आहेत, त्यामुळे या लढवय्या, धाडसी समाजाच्या सोबत लागलेला हा भामटा शब्द काढला जाईल.

महाराणा प्रताप सिंह यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय देखील आपण घेत आहोत. महाराणा प्रतापांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची देखील मागणी आहे. लवकरच पुतळा उभारू आणि त्याच्या उद्घाटनाला राजनाथ सिहांनाच बोलवू. अडीच वर्षापुर्वीचे सरकार कोमात होते, आता आपले सरकार जोमात आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून कधीही निधी कमी पडू दिला जात नाही, असे सांगतांनाच `राजपूत कैसा हो, राजनाथ सिंह जैसा हो`, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

Eknath Shinde News
Devendra Fadanvis On Karnataka : आमचा रेट इतरांपेक्षा चांगला, कधी जिंकतो कधी हरतो...

राजनाथ सिंह यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध देखील चांगले होते हे सांगतांनाच मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी मे महिन्याच्या कडक उन्हात राजनाथ सिंह प्रचाराला आले होते, अशी आठवण देखील शिंदे यांनी यावेळी सांगितली. राज्याच्या विकासासाठी राजपूत समाज सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीचा संदर्भ देत ही गर्दी पहा, असा टोला देखील लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com